Deshdoot Impact : बेवारस रुग्णवाहिका दुरूस्ती

ग्रामपालिकेकडून दखल
Deshdoot Impact : बेवारस रुग्णवाहिका दुरूस्ती
USER

म्हाळसाकोरे। वार्ताहर Mhalsakore

‘म्हाळसाकोरे रुग्णवाहिका बेवारस’ या मथळ्याखाली दै. देशदूतमध्ये Daily Deshdoot प्रसिद्ध झालेल्या बातमीची ग्रामपंचायतीने गांभीर्याने दखल घेत ही रुग्णवाहिका Ambulance पेट्रोल पंपावरुन हलवत निफाड येथे आणत किरकोळ दुरुस्तीसाठी लावल्याने आता ही रुग्णवाहिका रुग्णसेवेसाठी सज्ज होणार असल्याने ग्रामस्थांनी दै. देशदूत आणि ग्रामपंचायतीचे आभार मानले आहे.

सहा महिन्यांपूर्वी म्हाळसाकोरे ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली अन् रुग्णवाहिकेची चावी हरवली. विद्यमान सरपंच संजय पडोळ यांनी गावातील नागरिकांना विचारपूस केली पण मिळाली नाही. त्यांनी रुग्णवाहिका चालू करण्याचा प्रयत्न केला पण नाईलाज झाला. पर्यायाने रुग्णवाहिका एकाच जागेवर सहा महिने बेवारस उभी राहिली. नेमकी सहा महिन्यात करोनाची दुसरी लाट फोफावत होती.

रुग्णवाहिका नसल्यामुळे रुग्णांचे हाल होत होते. प्राथमिक आरोग्य विभागाने गाव परिसरात 44 जणांचा करोनामुळे मुत्यू झाल्याचे सांगितले. जर रुग्णवाहिका सुरू असती तर 44 हा आकडा काहीसा कमी ऐकायला मिळाला असता. रुग्णवाहिका सुरू व्हावी या उदांत हेतूने दै. देशदूतने ‘म्हाळसाकोरे रुग्णवाहिका बेवारस’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करताच ग्रामपंचायत खडबडून जागी झाली अन् रुग्णवाहिकेकडे धाव घेत ग्रामसेवक, सरपंच संजय पडोळ, उपसरपंच कमलाकर राऊत, दत्तु मुरकुटे, संतोष बाजारे, दत्तात्रेय बाजारे, छगन नागरे, नवनाथ मुरकुटे, दत्तू ढोबळे, रघुनाथ ढोबळे, आशोक पठारे, भिमा पठारे यांनी रुग्णवाहिकेची पहाणी करुन ट्रॅक्टरच्या सहाय्याने ओढत नेऊन निफाड येथे दुरुस्तीसाठी लावली आहे.

येत्या आठ-दहा दिवसात रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेसाठी गावात दाखल होईल असे सरपंच संजय पडोळ म्हणाले. रुग्णांची होणारी परवड आता थांबणार असून ग्रामस्थांनी दै. देशदूत आणि ग्रामपंचायतीचे आभार मानले आहे.

Related Stories

No stories found.