देशदूत इम्पॅक्ट : साईग्राम उद्यानास प्रभाग सभापतींसह अधिकाऱ्यांची भेट

तात्काळ कामास सुरुवात
देशदूत इम्पॅक्ट : साईग्राम उद्यानास प्रभाग सभापतींसह अधिकाऱ्यांची भेट

नवीन नवीन l New Nashik (प्रतिनिधी)

प्रभाग क्रमांक 27 मधील साईग्राम या हजारोच्या लोकसंख्या असलेल्या परिसरातील उद्यानाची दुरावस्था झाल्याचे वृत्त दै. देशदूतने दि. 23 रोजी प्रसिद्ध केले होते याची दखल घेत नवीन नाशिक प्रभाग सभापतिन सह अधिकाऱ्यांनी उद्यानाची पाहणी करून तात्काळ दुरुस्ती चे आदेश देण्यात आले.

साईग्राम हा सुमारे अडीच ते तीन हजार लोकसंख्या असलेला परिसर आहे या परिसरात गेल्या काही वर्षांपूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधींनी लाखो रुपये खर्च करून उद्यान बनवले मात्र लोकप्रतिनिधी बदलल्यानंतर सदर उद्यानाकडे मनपा प्रशासना सहित लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे.

दरम्यान या ठिकाणी रात्रीच्या वेळी मद्यपी लोक दारूच्या पार्ट्या करीत असल्याने स्थानिक रहिवाशांना त्याचा जाच सहन करावा लागत आहे तर महिलांना संध्याकाळच्या वेळी उद्यानात येता देखील येत नाही.

या ठिकाणी असलेल्या खेळण्यांची दुरवस्था झाल्यामुळे लहान मुलांना त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही तसेच याठिकाणी गाजर गवताचे साम्राज्य वाढल्याने सापांचा प्रादुर्भाव देखील परिसरात वाढत आहे.

या संदर्भात नवीन नाशिक प्रभाग सभापती चंद्रकांत खाडे, नाशिक विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे, उद्यान निरीक्षक प्रशांत परब यांचेसह अधिकाऱ्यांनी साईग्राम उद्यानाला भेट दिली.

यावेळी प्रभाग सभापती खाडे यांनी सदर उद्यानाचे एका आठवड्याच्या आत स्वच्छता करावी, तसेच येथील सुशोभीकरणासाठी तात्काळ नियोजन करावे असे आदेशीत केले. या ठिकाणी तात्काळ जेसीबी द्वारे जमा झालेल्या गाजर गवताची स्वच्छता करण्यात आली.

तसेच पुढच्याच आठवड्यात मंगळवारी लावण्यात येणाऱ्या झाडांची यादी मनपाकडे द्यावी व मनपातर्फे नागरिकांच्या सहकार्याने 'एक कुटुंब एक झाड' दत्तक देण्याचे ठरविण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com