देशदूत ईम्पॅक्ट: लासलगाव रुग्णालयाचे शस्त्रक्रिया गृह लवकरच कार्यान्वित

प्रशासकीय अधिकार्‍यांकडून रुग्णालयाची पहाणी
देशदूत ईम्पॅक्ट: लासलगाव रुग्णालयाचे शस्त्रक्रिया गृह लवकरच कार्यान्वित

लासलगाव। वार्ताहर | Lasalgaon

लासलगाव ग्रामीण रुग्णालयातील (Lasalgaon Rural Hospital) ऑपरेशन थिएटर (Operation theater) पावसाळ्यातील (rain water) पाणी गळतीमुळे

मागील दोन महिन्यांपासून बंद असल्यामुळे रुग्णांची गैरसोय (Inconvenience to patients) होत असल्याचा गंभीर प्रकार शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश पाटील (Shiv Sena Taluka Chief Prakash Patil) यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार (Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar) यांना याबाबत निवेदनही (memorandum) पाठविले होते. दै. देशदूतने (deshoot) 27 जुलैच्या अंकात त्यास सविस्तर प्रसिद्धी दिली होती. परिणामी या सर्व प्रकरणाची दखल घेत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार (dr bharti pawar) यांनी संबंधित अधिकार्‍यांनी लक्ष घालून ऑपरेशन थिएटर (Operation theater) लवकर सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच बंद पडलेले एक्स रे मशिन (X ray machine), इमारत पाणी गळती याकडेही लक्ष देण्याच्या सूचना केल्या आहेत.

शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रकाश पाटील यांचेसह पदाधिकार्‍यांनी 26 जुलै रोजी लासलगाव ग्रामीण रुग्णालयाची पहाणी केली असता कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया (Family planning surgery) गृह दोन महिन्यांपासून बंद असून टेक्निशियनअभावी एक्स रे मशिन देखील धुळखात पडून आहे. ऑपरेशन थिएटर पावसाळ्यात गळत असून अपुर्‍या कर्मचार्‍यांमुळे रुग्णांवर वेळेत उपचार होत नाही. या सर्व बाबींची प्रकाश पाटील यांनी ही सर्व माहिती निवेदनात (memorandum) नमूद करून सदरचे निवेदन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांना दिले होते.

परिणामी याची दखल घेत ना.भारती पवार यांनी संबंधित अधिकार्‍यांना रुग्णालयाची पहाणी (Hospital inspection) करण्याचे व मुलभूत सुविधा पुरविण्याचे आदेश दिल्याने काल शनिवार दि.6 रोजी प्रकाश पाटील यांचेसमवेत उपअभियंता भुषण देसले, सहाय्यक अभियंता जितेंद्र सातारकर, राष्ट्रवादीचे बबन शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.सतिष सूर्यवंशी, डॉ.स्वप्नील पाटील यांनी रुग्णालयाची पहाणी केली होती. तसेच पुढील पाच दिवसात रुग्णालय इमारतीची गळती बंद करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या.

तसेच एक्स रे मशिन, टेक्निशियनची आठ दिवसात कायमस्वरूपी नेमणूक करण्याच्या सूचना करून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.थोरात यांचेकडून या रुग्णालयाबाबत माहिती घेत इमारतीची गळती बंद करण्याबरोबरच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले. परिणामी पुढील पाच दिवसात या रुग्णालयात रुग्णांसाठी परिपूर्ण सुविधा व शस्त्रक्रिया सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रकाश पाटील यांनी याप्रश्नी लक्ष वेधल्याने व दै. देशदूतनेही त्यास ठळक प्रसिद्धी दिल्याने लासलगाव परिसरातील नागरिकांनी दै. देशदूतचे आभार मानले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com