‘देशदूत’ वृत्ताची दखल : भेंडाळी उपकेंद्रात करोना लसीकरण सुरू

‘देशदूत’ वृत्ताची दखल : भेंडाळी उपकेंद्रात करोना लसीकरण सुरू

म्हाळसाकोरे । प्रतिनिधी

भेंडाळी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात लसीकरणास सुरुवात झाल्याने नागरिकांनी ‘देशदूत’चे आभार मानले आहेत.

भेंडाळी, औरंगपूर, महाजनपूर, तळवाडे, पिंपळगाव निपाणी आदी गावांतील नागरिकांना करोना लसीकरणासाठी म्हाळसाकोरे प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागत होते.

साहजिकच वरील गावांपासून म्हाळसाकोरे हे 20 ते 25 कि.मी. अंतरावर आहे. त्यामुळे वयोवृद्ध नागरिकांना लसीकरणासाठी दिवसभर थांबावे लागत होते. अनेक वेळा नागरिकांना पुन्हा-पुन्हा हेलपाटे मारावे लागत होते. हीच बाब हेरून ‘देशदूत’ने 11 एप्रिल रोजी भेंडाळी येथे लसीकरण केंद्र सुरू करण्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. तसेच या वृत्ताच्या कात्रणासह जि. प. सदस्य सुरेश कमानकर यांनीही शासन दरबारी पाठपुरावा केला होता. त्यामुळे या वृत्ताची आरोग्य विभागाने तत्काळ दखल घेत भेंडाळी येथे लसीकरण केंद्र सुरू केले.

या केंद्रामुळे परिसरातील गावच्या नागरिकांची होणारी गैरसोय दूर झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी ‘देशदूत’चे आभार मानले आहेत. या लसीकरण केंद्राच्या शुभारंभप्रसंगी भेंडाळीचे उपसरपंच सोमनाथ खालकर, भगवान चव्हाण, आरिफ इनामदार, संजय खालकर, भाऊसाहेब कमानकर, गणेश मोगल, गोरख खालकर, संतोष दराडे, राजेश सांगळे, भाऊसाहेब खालकर, ग्रामसेविका निपुंगळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार, डॉ. सानप, डॉ. प्रतीक बोरसे यांच्यासह भेंडाळी, औरंगपूर, महाजनपूर परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com