Deshdoot Impact : देवी मंदिर परिसरात नाल्याची स्वच्छता

Deshdoot Impact : देवी मंदिर परिसरात नाल्याची स्वच्छता

दे. कॅम्प । वार्ताहर Devlali Camp

येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वॉर्ड क्रमांक सहा मधील रेणुकामाता मंदिरालगत Renuka Mata Mandir असलेल्या नाल्यात sewage canal साचलेली दुर्गंधी व त्यामुळे निर्माण झालेला आरोग्याचा प्रश्न याबाबत 'देशदूत' ने Deshdoot आवाज उठवितात बोर्ड प्रशासनाने जेसीबीच्या साह्याने नाल्यांची साफसफाई करून जनतेला दिलासा दिला आहे.

उत्तर महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या रेणुकामाता मंदिरालगतच्या नाल्यातून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी येत होती. याच परिसरात केंद्रीय विद्यालय व विविध रहिवासी सोसायट्यां असल्याने नागरिकांचा येथे मोठा राबता आहे. या नाल्याची स्वच्छता पावसाळ्यापूर्वी होणे गरजेचे असताना ती न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात गवत व झाडेझुडपे वाढली होती. शिवाय मलमिश्रित पाणी एकाच ठिकाणी थांबून राहिल्याने डासांची निर्मिती होऊन विविध साथीच्या आजाराने येथील नागरिक बेजार झाले होते.

याबाबत दैनिक देशदूतने वृत्त प्रसिद्ध केले होते. तसेच माजी नगरसेविका कावेरी कासार, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आडके यांच्यासह विविध सामाजिक संघटना व कार्यकर्ते यांनीही बोर्ड प्रशासनाला नाला स्वच्छतेबाबत सूचना केल्या होत्या. नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल गजभिये यांनी याबाबत तातडीने दक्षता घेऊन आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता यांना पाहणी करून सदरचे काम जलदगतीने करण्याच्या सूचना केल्या.

त्यानुसार काल संपूर्ण नाल्याची जेसीबीच्या साहाय्याने स्वच्छता करून साचलेले पाणी काढून देण्यात आले. पाणी वाहते झाल्याने डासांची निर्मिती थांबणार आहे. प्रशासनाने या नाल्याची प्रत्येक महिन्यात स्वच्छता करावी तसेच फर्जंदी बागेलगत असलेल्या रेल्वे पुलाखाली साचणारे पाणी वेळचे वेळी काडून द्यावे अशी मागणी येथील नागरिकासह शाळेच्या प्रशासनाकडून केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com