देशदूत गुणवंत गौरव सोहळा २०२२ : महिला सक्षमीकरण - स्ट्रॉबेरी स्वयंसहाय्यता महिला समूह

देशदूत गुणवंत गौरव सोहळा २०२२ :  महिला सक्षमीकरण - स्ट्रॉबेरी स्वयंसहाय्यता महिला समूह

नाशिक | प्रतिनिधी Nashik

स्ट्रॉबेरी स्वयंसहाय्यता महिला समूह (Strawberry Self Help Women's Group) हा सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथील गट. सोनालीताई भालेराव यांनी सन 2018 मध्ये हा गट स्थापन केला. त्यांना गावातील महिलांची भक्कम साथ मिळाली.

बँकेने 2 लाख 80 हजारांचे कर्ज दिले. त्या कर्जातून या गटाने स्ट्रॉबेरी विकण्याबरोबरच स्ट्रॉबेरीची रोपेही तयार करून विकण्यास सुरुवात केली. तत्पूर्वी स्ट्रॉबेरी रोपे खरेदीसाठी थेट महाबळेश्वरला जावे लागत होते. ती रोपे स्थानिक स्तरावरच उपलब्ध झाल्याने त्याचा आजूबाजूच्या शेतकर्‍यांना फायदा झाला.

पहिल्यांदा घेतलेले कर्ज व्याजासह फेडून गट प्रगतिपथावर आहे. गटातील महिलांचे स्वत:चेही छोटे छोटे व्यवसाय आहेत. या महिला बँकेत जाऊन व्यवहार करतात. प्रत्येकीचा जीवन विमा आहे. शासकीय योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ घेतात. ग्रामसभेत प्रश्न विचारतात.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com