देशदूत गुणवंत गौरव सोहळा २०२२ : उपक्रमशील शिक्षक - खंडू मोरे, संजय गुंजाळ

देशदूत गुणवंत गौरव सोहळा २०२२ :  उपक्रमशील शिक्षक - खंडू मोरे, संजय गुंजाळ

नाशिक | प्रतिनिधी Nashik

देवळा तालुक्यातील ( Deola Taluka ) फागंदर ( Fagandar )वस्तीशाळेत खंडू मोरे, संजय गुंजाळ ( Khandu More, Sanjay Gunjal )हे दोघे शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक आणण्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे.

100 टक्के पटनोंदणी व उपस्थितीसाठी ते सतत प्रयत्नशील असतात. शासनाच्या पोलिओमुक्त अभियानात सक्रिय सहभाग. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची अभिरुची वाढावी यासाठी शाळेत ग्रंथालय स्थापले. लोकसहभागातून पुस्तके मिळवण्यासाठी वाढदिवसाच्या दिवशी ग्रंथालयाला पुस्तक भेट ही योजना सुरू केली आहे.

त्यांच्या शाळेने डिझाईन फॉर चेंज उपक्रमात आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभाग घेत देशात नववा क्रमांक मिळवला आहे. आदिवासी शेतमजुरांच्या मुलांना विमानातून प्रवास घडवणारी राज्यातील पहिली शाळा. शिकवण्याच्या नवीन पद्धती विकसित केल्या. विद्यार्थी उत्तम अंक ओळख, मराठी, इंग्रजी भाषा लिहू-वाचू शकतात. हे त्यांच्याच प्रयत्नांचे फलित.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com