देशदूत गुणवंत गौरव सोहळा २०२२ : विशेष कर्तृत्व - आम्रपाली पगारे

देशदूत गुणवंत गौरव सोहळा २०२२ : विशेष कर्तृत्व - आम्रपाली पगारे

नाशिक | प्रतिनिधी Nashik

आम्रपाली पगारे ( Aamrapali Pagare ) अवघ्या पंधरा वर्षांची आहे. गायनाची लहानपणापासूनच आवड होती. पण शिकायचे कोणाकडे हा प्रश्नच होता.

कारण घरची परिस्थिती सर्वसाधारण. त्यामुळे छंद कसा जोपासणार या शंकेने तिला सतावले होते. तिने गायनाचे कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेले नाही. तरीही साडेचार हजार स्पर्धकांतून थेट इंडियन आयडॉलमध्ये धडक मारली. अंतिम 14 स्पर्धकांमध्येही ती होती. सध्या ती येवला तालुक्यातील सावरगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात नववीच्या वर्गात शिकते.

नांदूर या छोट्याशा गावात पगारे कुटुंबीय राहतात. वडील गौतम पगारे यांचा बॅन्जोचा व्यवसाय आहे. तिने फक्त मोबाईलवर संगीत व गाणे ऐकून आपल्यातील गायन कलेला वाव मिळवून दिला. आम्रपालीचे वडील गौतम पगारे यांनी म्हटले की, माझ्या मुलीवर माझा विश्वास होता आणि तो तिने सार्थ ठरवला. मला संधी मिळू द्या, मी सोने करेल हे ती नेहमी म्हणायची.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com