देशदूत गुणवंत गौरव सोहळा २०२२ : सामाजिक संस्था - सनय फाऊंडेशन

देशदूत गुणवंत गौरव सोहळा २०२२ :  सामाजिक संस्था - सनय फाऊंडेशन

नाशिक | प्रतिनिधी Nashik

2008 मध्ये नाशिकमधील डॉ. भूषण सुरजुसे(Dr. Bhushan Surjuse), नीलेश गायकवाड ( Nilesh Gaikwad ) हे दोन मित्र एकत्र आले. त्यांनी काम सुरू केले. नंतर त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी सनय फाऊंडेशन ( Sanay Foundation )स्थापन केले. सुरुवातीच्या टप्प्यात एका वाडीवर काम सुरू केले.

त्या वाड्यांची संख्या आता 33 वर पोहोचली आहे. पेठ तालुक्यात पाणी, आरोग्य, शिक्षण अशा विविध सामाजिक प्रश्नांवर फाऊंडेशन कार्यरत झाले. झरी हे गाव दत्तक घेतले. झरी, आंबेस, बेहेडपाडा येथे पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेल आणि हातपंप बांधला.

विविध पाड्यांवर 120 हून अधिक शौचालये बांधली. दहा हजार आंबा आणि काजूच्या झाडांची लागवड, 2500 वड, पिंपळ, चिंच, शेवगा झाडे लावली. जेणेकरून आदिवासींना स्थानिक स्तरावरच उत्पन्न मिळावे आणि त्यांचे स्थलांतर थांबावे. तसेच घडत आहे. 41 गरजू कुटुंबांना वॉटर फिल्टर आणि स्वयंपाकघरातील भांडी दिली. अनुदानित दराने सात वाड्यांमध्ये गॅस कनेक्शन दिले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com