देशदूत गुणवंत गौरव सोहळा २०२२ : नवउद्योजक - विश्वजित मोरे

देशदूत गुणवंत गौरव सोहळा २०२२ : नवउद्योजक - विश्वजित मोरे

नाशिक | प्रतिनिधी Nashik

शेतीला कर्मभूमी मानून ती वाचवण्याची शेती सुरू केली. फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केली. पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन व माती परीक्षण करून घेत पीक पद्धतीत बदल (क्रॉपिंग पॅटर्न) करून शेती व्यवसाय केला तर शेतीला निश्चितच चांगले भवितव्य आहे, हे स्पष्ट केले.

वाट्याला कोणती जमीन येते हे शेतकरी सांगू शकत नाही. कोणती जमीन कशी आहे, हेही त्याला माहिती नसते. त्यामुळे आपल्या वाट्याला जी जमिनी येते त्यातील माती ही काळी कसदार, लालसर आहे, दगड गोट्यांची की मुरमाची आहे हे पाहून आपण पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे, असे विश्वजित मोरे ( Vishvajit More)सांगतात.

युवा शेतकर्‍यांनी शेतीकडे वळून आवश्यक त्या आधुनिक पद्धतीने शेती केली तर शेतीला निश्चितच चांगले दिवस येतील. शेती व्यवसायाला निश्चितपणे भविष्यदेखील आहे, असा विश्वास ते व्यक्त करतात.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com