देशदूत गुणवंत गौरव सोहळा २०२२ : साहित्य - स्वानंद बेदरकर

देशदूत गुणवंत गौरव सोहळा २०२२ :  साहित्य - स्वानंद बेदरकर

नाशिक | प्रतिनिधी Nashik

कवीला जशी कविता सुचते तसे व्यासपीठावर उभे राहिल्यावर वक्त्याला विचार आणि भाषा सुचत असेल तर असे होण्यासाठी विविध विषयांचा अभ्यास, त्यावरचे स्वतंत्र चिंतन आणि शारदेचा आशीर्वाद महत्त्वाचा असतो.

स्वानंद बेदरकर ( Svanand Bedarkar )यांनी देवळ्यातील श्री शिवाजी इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केले. गावातील कार्यक्रमात छोटासा श्लोक किंवा स्वागत गीत म्हणायची संधी मिळत गेली. तेथूनच वक्तृत्वावरील पकड मजबूत झाली. भिक्षुकी करून घरचा आर्थिक प्रश्न सोडवण्याचे काम केले.

वाचनामुळे अनेक विचारवंतांचे मार्गदर्शन त्यांना लाभले आणि जीवनाची दिशा मिळाली, असे ते म्हणतात. प्रकाशक, सूत्रसंचालक, लेखक, साहित्यिक म्हणूनही नाशिककरांना परिचित आहेत. त्यांनी अनेकांना लिहिते करून त्यांची पुस्तके प्रकाशित केली आहेत. सरस्वतीचा आशीर्वाद असलेल्या त्यांच्या वाचेला खूप दाद मिळत असते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com