देशदूत गुणवंत गौरव सोहळा २०२२ : उद्योजक, मेंटॉर - राजेंद्र बागवे

देशदूत गुणवंत गौरव सोहळा २०२२ :  उद्योजक, मेंटॉर - राजेंद्र बागवे

नाशिक | प्रतिनिधी Nashik

राजेंद्र बागवे ( Rajendra Bagwe )यांनी टीएलसी ( TLC)अर्थात दि टीचिंग लर्निंग कम्युनिटी या एसएमईच्या समुदायाची स्थापना केली. त्याला नुकतीच 17 वर्षे पूर्ण झाली.

यशस्वी होण्यासाठी भारतीय उद्योजकांना मदत करणे हा या समुदायाचा उद्देश आहे. याची सुरुवात मुठभर मित्रांना त्यांच्या व्यावसायिक समस्यांवर समाधान शोधून देण्यापासून आणि मदत करण्यापासून सुरु झाली. पण आता कामाचा परीघ वाढला आहे. या माध्यमातून उद्योजकांना टीएलसीने आतापर्यंत दोन हजारांहून अधिक एसएमईचे मार्गदर्शन केले आहे.

सध्या टीएलसीच्या सुमारे एक हजार सक्रिय सदस्यांना ते समर्थन देत आहेत. त्यात उत्पादन, आयटी, सेवा, फार्मा, रुग्णालये, व्यापार आदी क्षेत्रांचा समावेश आहे. हा निरंतर कार्यक्रम आहे.

नेतृत्व, धोरण, आर्थिक परिणाम, कर्मचारी अभियान, ग्राहक समाधान आणि सामाजिक जबाबदारी यात परिणाम मिळवण्यासाठी विविध व्यवसाय संकल्पना शिकणे आणि शिकवणे यावर हा समुदाय विश्वास ठेवतो.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com