परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढणार; पोलीस उपअधीक्षक निपुंगे यांच्या आरोपांची राज्य सरकारकडून गंभीर दखल

परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढणार; पोलीस उपअधीक्षक निपुंगे यांच्या आरोपांची राज्य सरकारकडून गंभीर दखल

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकचे पोलीस ग्रामीणचे पोलीस उपअधिक्षक शामकुमार निपुंगे यांनी केलेल्या आरोपानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. 14 जून रोजी जर तक्रार दिली आहे तर अद्यापपर्यंत गुन्हा का दाखल केला गेला नाही असाही सवाल विधानसभा उपसभापती नरहरी झिरवळ यांनी नाशिक पोलिसांना केला असून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत....

काल (दि ०५) माध्यमांशी संवाद साधताना माजी पोलीस आयुक्तांवर निपुंगे यांनी आरोप केले होते. यानंतर याप्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे.

2016 साली भिवंडी येथील वाहतूक शाखेत कर्तव्य बजावत असताना बेकायदेशीर वाहतुकीसंदर्भात काही पोलीस अधिकाऱ्यांविषयी तक्रारी आल्याने त्यांनी अवजड वाहचालकांचे जबाब नोंदवून चौकशी सुरू केली होती.

यावेळी तत्कालीन पोलीस आयुक्त असलेले परमवीरसिंग यांनी त्यांची तडकाफडकी बदली केली होती. ठाणे जिल्ह्यात 2017 निपुंगे यांच्या कार्यालयातील सुभद्रा पवार या महिला पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली होती. त्यात निपुंगे यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती.

'मी नारपौली येथील गैरव्यवहाराची माहिती संकलीत करण्यास सुरूवात केली होती. त्या ठिकाणी कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक थेट परमवीर सिंग यांचे नाव घेऊन एक कोटी रूपये देऊन बदली घेतल्याचे सांगत होते.

सुभद्रा पवार हीची आत्महत्या नसून खून असल्याचे परिस्थितीजन्य पुरावे समोर आले होते. मात्र, पुरावे न्यायलयात सादर केले गेले नाहीत.

तसेच शवविच्छेदनाचे रेकॉर्डिंग करण्यात आले. छायाचित्र घेण्यात आले होते. प्रत्यक्ष फिर्याद आणि हे पुरावे यांची सांगड नसल्याने ते पुरावेही दाबण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 2017 साली मी सर्व कागदपत्रे मिळविण्यात सुरुवात केली. सुभद्रा पवार हिच्या हत्या प्रकरणात माझा थेट संबंध नसल्याचे स्पष्ट केले. पुराव्यांची सांगड आणि जुळवाजुळव सुरू असल्याने आपण तक्रार करत असल्याचे निपुंगे यांचे म्हणणे आहे.

या गुन्ह्यात गोवले गेल्यामुळे माझी बदनामी होऊन पोलीस खात्यात प्रतिमा मालिन झाल्याचे त्यांनी सांगितले. आडगाव पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीमध्ये त्यांनी परमवीर सिंग यांच्यासह विविध अधिकाऱ्यांवर आपापसांत कट रचून संगनमताने अधिकारपदाचा दुरुपयोग करून खोटे पुरावे तयार करत सुभद्रा यांच्या खुनाच्या गुन्ह्यात गोवल्याचा आरोप केला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com