
नाशिक । प्रतिनिधी Nashik
जिल्ह्यात नुकत्याच निवडणुका झालेल्या १९६ ग्रामपंचायतींची ( Grampanchayat )पहिली ग्रामसभा ( Gramsabha )जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पार पडणार आहे.संबंधित सरपंचाच्या अध्यक्षतेकाळी होणाऱ्या या सभेत उपसरपंचा पदाची ( Deputy Sarpanch )निवड होणार आहे.
जिल्ह्यातील १४ तालूक्यांमध्ये मागील आठवड्यात १९६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका झाल्या.यामध्ये सरपंच पदासाठी थेट निवडणूक झाली.आता उपसरपंच निवड ही निवडून आलेल्या सदस्यांमधून होणार आहे. त्यामुळे या निवडीलाही महत्व आले आहे. त्यामुळे इच्छूकांनी आतापासूनच लॉबिंग सुरू केली आहे.
झालेल्या निवडणूकांमध्ये अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले आहेत.काही ठिकाणी सरपंच एका गटाचा तर सदस्य दुसऱ्या गटाचा,असाही प्रकार घडला आहे.तर काही ठिकाणी मतदारांनी प्रस्थापितांना धक्का देत युकांना संधी देत गावाचा कारभार सोपविला आहे.
आता उपसरपंच निवडीकडे साऱ्च्याच नजरा लागल्या आहेत. जिल्हा प्रशासनातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार जानेवारीच्या ३ किंवा ४ तारखेला ग्रामपंचायतींची पहिली सभा सरपंचांच्या अध्यक्षतेत होईल.यात उपसरपंच पदासाठी निवड केली जाणार आहे.