
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik
शहरातील उत्तमनगर परिसरात (Uttam Nagar Area) एका घरात स्फोट (Blast) होऊन घरातील तीन जण जखमी (Injured) झाल्याची घटना घडली होती. परंतु, त्यावेळी हा स्फोट कशामुळे झाला याची माहिती समोर आली नव्हती. त्यानंतर आता या स्फोटाचे कारण समोर आले असून हा स्फोट गॅस गळतीमुळे (Gas Leakage) झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत (Monika Raut) यांनी दिली...
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, बुधवार (दि.२७ सप्टेंबर) सकाळी सहा वाजेच्या सुमारास उत्तमनगर येथील सर्वेश्वर महादेव चौकातील एका घरात अचानक स्फोट झाला होता. यामध्ये घरातील तुषार पंडित जगताप (३४),त्यांची आई शोभा पंडित जगताप वय (६५) सासरे बाळकृष्ण तुळशीराम सुतार (६८) हे तिघे भाजले (Burn) होते.
तर घरातील खिडकीत ठेवलेले कॉस्मेटिक वस्तू, बॉडी स्प्रे, मोबाईल फोन खिडक्या फुटून बाहेर फेकले गेले होते. हा स्फोट एवढा भीषण होता की, घरासमोर पंधरा ते वीस फुटाच्या अंतरावर असलेल्या चारचाकी वाहनांच्या काचाही फुटल्या होत्या.
त्यावेळी मोबाईलचा स्फोट (Mobail Blast) झाल्याने सदरहू घटना घडल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले होते. मात्र तपासाअंती शोभा पंडित जगताप यांनी अंघोळीचे पाणी तापवायला गॅसचे (Gas) बटन सुरु केले होते. मात्र, गॅस न पेटल्यामुळे त्यांनी माचीस शोधायला सुरूवात केली.
यावेळी गॅसचे बटन सुरूच होते. शोभा यांना माचीस सापडल्यानंतर त्यांनी काडी पेटवली असता घरात जमलेल्या गॅसने पेट घेतल्याने मोठा स्फोट झाला अशी माहिती उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली.