Video : राज्यसेवा परीक्षेत मुलींमध्ये पहिल्या आलेल्या मानसी पाटील म्हणतात...

नाशिक | प्रतिनिधी Nashik

राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019 (MPSC)चा अंतिम निकाल जाहीर केला. मूळ जळगावच्या पण हल्ली नाशिककर असलेल्या मानसी पाटील (Mansi Patil) यांनी मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे....

मागील अनेक दिवसांपासून हे उमेदवार एमपीएससीकडे (MPSC) निकाल लावण्याची मागणी करत होते अखेर निकाल जाहीर करण्यात आल्याने आता या उमेदवारांना जॉईनिंग लवकरात लवकर मिळावी अशी अपेक्षा आहे.

या परीक्षेसाठी खूप मेहनत घेतली होती. जून 2020 मध्ये उपजिल्हाधिकारी (Deputy Collector) म्हणून निवड तर झाली मात्र त्यानंतर अनेक कोर्ट केसेसमध्ये निकाल अडकला आणि दीड वर्षांनंतर हा दिवस उगवला असे मानसी म्हणते.

सुधारित निकालात मला हे यश मिळाले असल्याचे तिने सांगितले. 2015 पासून अभ्यासाला सुरुवात केली होती, स्वतःला शोधत, चुका सुधारत इथपर्यंत प्रवास केला. कळत्या वयापासून स्वप्न बघितले होते, घरची पण प्रशासकीय कामातील पार्श्वभूमी आहे. ग्रामीण भागातून असल्याने हे क्षेत्र निवडले आणि प्रयत्न सुरु केले. आई, वडील आणि एकत्र कुटुंबाचा यात खूप मोठा वाटा आहे असल्याचे मानसी म्हणाली.

Related Stories

No stories found.