Nashik News : उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नाशकात आगमन; मंत्री भुजबळांनी केले स्वागत

Nashik News : उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नाशकात आगमन; मंत्री भुजबळांनी केले स्वागत

नाशिक | Nashik

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आज एकदिवसीय नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून या दौऱ्यात त्यांचे नाशिक ग्रामीण भागात विशेष लक्ष असणार आहे. नुकतेच त्यांचे ओझर विमानतळावर आगमन झाले असून राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) व मुंबई अध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले...

अजित पवार यांच्या उपस्थितीत आज कळवण (Kalwan) येथे साडे अकरा वाजता शेतकरी कृतज्ञता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी उपस्थित शेतकऱ्यांना अजित पवार संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमानंतर राष्ट्रवादीच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या घरी देखील ते भेट देणार आहेत. यावेळी अजित पवार यांच्यासोबत खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे देखील उपस्थित आहेत.

Nashik News : उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नाशकात आगमन; मंत्री भुजबळांनी केले स्वागत
Asian Games 2023 मध्ये भारताने रचला इतिहास, २५ सुवर्णांसह जिंकली १०० पदकं

त्यानंतर दुपारी ३ वाजता दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) सह्याद्री ऍग्रो फार्म हाऊस या ठिकाणी संवाद साधणार आहेत. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाशिक शहरात (Nashik City) आगमन होणार असून राष्ट्रवादी भवन कार्यालयात कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आहेत. त्यानंतर पुन्हा शासकीय वाहनाने ओझर विमानतळाकडे (Ozar Airport) प्रस्थान करणार आहेत.

दरम्यान, यावेळी ओझर विमानतळावर अजित पवारांच्या स्वागतासाठी मंत्री भुजबळ यांच्यासह जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पगार, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Nashik News : उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नाशकात आगमन; मंत्री भुजबळांनी केले स्वागत
नाशिक जिल्ह्यातील २४ धरणात 'इतका' पाणीसाठा
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com