अद्यावत इमारतीपासून शालेय विद्यार्थी वंचित

इमारत ताब्यात घेण्यावरून दोन विभागात एकमेकांकडे अंगुली निर्देश
अद्यावत इमारतीपासून शालेय विद्यार्थी वंचित

ओझर। वार्ताहर | Ozar

येथील जिल्हा परिषद (zilha parishad) प्राथमिक शाळेच्या (Elementary school) अद्ययावत नुतन इमारतीचे लोकार्पण होऊन नऊ महिन्यांचा कालावधी लोटला असतांंनाही अद्यापपर्यंत सदरची इमारत कोणी ताब्यात घ्यायची हा प्रश्न अनुत्तरित असल्याने शाळा (school) ओस पडली आहे.

तर विद्यार्थ्यांअभावी वर्गखोल्या रिकाम्या आहेत. किमान नव्या शैक्षणिक वर्षात तरी प्रशासनाने शाळेचे इमारत ताब्यात घेऊन विद्यार्थ्यांसाठी (students) या वर्ग खोल्या उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी विद्यार्थी, पालक करीत आहेत.

येथील जिल्हा परिषद शाळेची (Zilha Parishad School) इमारत निर्लेखित होऊन पाच वर्षांचा कालावधी उलटून गेला होता. त्यानंतर सीएसआर फंडातून 1 कोटी रुपये खर्च करून नवीन दुमजली इमारतीचे बांधकाम (Construction of the building) करून देण्यात आले. 21 जून 2021 रोजी इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. याला नऊ महिन्यांचा कालावधी उलटला परंतु अद्याप नव्या इमारतीत वर्ग भरत नाहीत.

नऊ महिन्यातील काही काळ करोनाचा वगळला तर दिवाळीनंतर (diwali) शाळा हळूहळू पूर्वपदावर येऊनही शाळा स्थलांतरित करण्यात आली नाही. त्यामुळे शाळा ओस पडून तेथे टवाळखोर आपला डेरा टाकत आहेत. रात्रीच्या सुमारास विद्या मंदिराच्या परिसरात मद्य पार्ट्या रंगत असून त्यामुळे शाळेच्या परिसरात घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे.

इमारत ताब्यात घेण्यावरून संभ्रम

येथील जि.प. प्राथमिक शाळेची इमारत एच.ए.एल ने बांधून दिल्यानंतरही ही इमारत कोणी ताब्यात घ्यायची यावरून जिल्हा परिषद, पंचायत समिती निफाड यांच्या अधिकार्‍यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पंचायत समिती जिल्हा परिषदेकडे बोट दाखवते तर जिल्हा परिषद पंचायत समिती प्रशासनाकडे अंगुली निर्देश करते. एकाच खात्यातील दोन विभागाकडून मात्र शाळेची इमारत ताब्यात घेण्यासाठी टोलवाटोलवी केली जात आहे.

इमारत मुख्याध्यापकांच्या ताब्यात देवू ओझर येथे जि.प. शाळेसाठी बांधलेली इमारत कोणी ताब्यात घ्यावी यात पंचायत समितीच्या इमारत व दळणवळण विभागात संभ्रम होता आणि ओझरला नगरपरिषद झाल्याने त्यात आणखी भर पडली. या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करताना वेळ गेला. पंचायत समिती अभियांत्रिकी विभागाने इमारतीची पाहणी केली असून शाळेची इमारत लवकरच मुख्याध्यापकांच्या ताब्यात देण्यात येईल.

- केशव तुंगार, गटशिक्षणाधिकारी (पं.स. निफाड)

चांगल्या शिक्षणासोबतच दर्जेदार इमारत असणे विद्यार्थ्यांचा अधिकार असून येथील जि.प. शाळेतील विद्यार्थी या अधिकारासाठी सात वर्षांपासून संघर्ष करत आहेत. प्रशासनाने त्यांच्या स्तरावरील कार्यवाही पूर्ण करून किमान नवीन शैक्षणिक वर्षापासून तरी विद्यार्थ्यांना नव्या इमारतीत ज्ञानदान करावे.

- पांंडूरंग आहेर, अध्यक्ष (शालेय व्यवस्थापन समिती ओझर)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com