अनु. जातीचे नागरिक सदस्यपदापासुन वंचित

अनु. जातीचे नागरिक सदस्यपदापासुन वंचित
न्यूज अपडेट २/News update 2न्यूज अपडेट २/News update 2

पुनदखोरे। वार्ताहर Punadkhore

कळवण तालुक्यातील (kalwan taluka) ग्रामीण भागात अनुसूचित जातींच्या नागरीकांची नियमाने मोठ्या प्रमाणात लोकसंख्या (Population) असुनही त्यांना ग्रामपंचायत सदस्यापदापासून वंचित राहावे लागत आहे.

तहसिल विभाग (Tehsil Department) व ग्राम पंचायत विभागाने (Gram Panchayat Department) अनुसूचित जातीच्या (Scheduled Castes) नागरीकांची प्रत्येक गावात जणगणना करून लोकसंख्येच्या आधारावर ग्रामपंचायत निवडणुकीत (Gram Panchayat Election) प्राधान्य देण्याची मागणी कळवण तालुका आंबेडकरी विचार मंचच्यावतीने निवेदनाव्दारे (memorandam) करण्यात आली असुन या याबाबतचे निवेदन गटाविकास अधिकार्‍यांना (Group Development Officers) देण्यात आले आहे.

कळवण तालुक्यातील ग्रामीण भागात अनु.जाती प्रवर्गातील लोकसंख्या लक्षात घेता तालुक्यात काही तुरळक ग्रामपंचायती वगळता बर्‍याच ग्रामपंचायतींवर अनु. जातीचे सदस्य नाही. शासनाच्या नियमाने प्रत्येक गावात अनु. जातीच्या जागेंसाठी जेवढी लोकसंख्या आवश्यक आहे. त्या पेक्षाही कीत्येक पटीने अनु. जातीची लोकसंख्या प्रत्येक गावात आहे. तरी सुद्धा अनु. जातीच्या आरक्षित जागेसाठी तालुक्यात कित्येक ग्रामपंचायतींवर सदस्यपदासाठी (Membership) जागा उपलब्ध नाही.

कळवण तालुक्यातील रवळजी ग्रामपंचायतीसह बर्‍याच ग्रामपंचायतींची सदस्यपदांची जागा जाणीवपुर्वक रद्द केल्या असुन हा अनु. जातीच्या नागरीकांवर अन्याय आहे. त्यामुळेच प्रशासनाने ग्रामसेवकांना या संदर्भात आदेश देऊन अनु. जातीच्या लोकसंख्येची गावनिहाय जणगणना करून अनु. जातीच्या आरक्षित जागेसाठी पाठपुरावा करण्याची मागणी यावेळी कळवण तालुका आंबेडकरी विचार मंचच्यावतीने प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com