Video : 'माझे जीवाची आवडी नेई पंढरपुरा गुढी'

संत निवृत्तीनाथ पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
Video : 'माझे जीवाची आवडी नेई पंढरपुरा गुढी'

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwer

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे (Sant Nivruttinath Maharaj palkhi) आषाढी वारीसाठी (Ashadhi Ekadashi) पंढरपूरकडे (Pandharpur) सहा वाजून पंचवीस मिनिटांनी प्रस्थान झाले. पालखीला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वारकरी आणि भाविक उपस्थित होते.

आषाढी एकादशी निमित्त संत निवृत्ती नाथ पालखी आज धो धो पावसात रवाना झाली. टाळ मृदंग गजरात शिवशाही बस (Shivshahi Bus) पंढरपूर कडे रवाना झाल्या. सलग दुसऱ्या वर्षी पायी वारी रद्द करून संत निवृत्ती नाथ पालखी शिवशाही बसने पंढरपूरला गेली.

दरम्यान आज पहाटे संत निवृत्तीनाथ मंदिरात पुजारी सचितानंद गोसावी यांच्या हस्ते महापूजा (Mahapuja) करण्यात आली. त्यानंतर संत निवृत्तीनाथ मंदिरापासून पायी दिंडीने पालखी कुशावर्त वर (Kushawart) आली. येथे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर (Nagradhyaksh Purushottam Lohgoankar) यांनी सपत्नीक पूजा आरती केली. तेथून पायी त्रंबकेश्वर मंदिरासमोर (Trimbakeshwer Mandir) येत टाळ मृदुंग गुजरात अभंग वाणी करण्यात आली. यावेळी वारकरी महिलांनी फुगड्या खेळल्या.

आंबेडकर चौकात आमदार हिरामण खोसकर (MLA Hiraman Khoskar) यांनी पालखीचे स्वागत केले. बस मध्ये पालखी ठेवताच पुंडलिक वर दे चा गजर करण्यात आला.

प्रांताधिकारी तेजस चव्हाण ग्रामीण ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त होता.

संत निवृत्तीनाथ मंदिराचे जयंत महाराज गोसावी म्हणाले की त्यांनी पंढरपूर पायी वारीसाठी परवानगी द्यावी अशी मागणी शासनाकडे केली होती. मात्र कोरोनाच्या संकट काळात ते शक्य नसल्याचे प्रशासनाने सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com