नांदुरशिंगोटे ते आळंदी पायी दिंडीचे प्रस्थान

नांदुरशिंगोटे ते आळंदी पायी दिंडीचे प्रस्थान

नांदूरशिंगोटे । वार्ताहर Nandurshingote

श्री क्षेत्र नांदूरशिंगोटे ते श्री क्षेत्र आळंदी Nandurshingote to Aalandi Dindi पायी दिंडीचे टाळ-मृदंगाच्या गजरात प्रस्थान झाले. पायी दिंडी सोहळ्यात दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या संकटामुळे सर्वच क्षेत्रातील कार्यक्रमांना बंदी असल्याने त्याचा फटका दिंडी सोहळ्यांना बसला होता. मनसापुरी महाराज यांच्या आशीर्वादाने पंधरा वर्षांपासून नांदूरशिंगोटे ते आळंदी पायी दिंडी सोहळा आयोजित केला जात आहे. येथील रेणुकामाता मंदिराच्या प्रांगणातून सजविलेल्या आकर्षक रथातून ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेची व मनसापुरी महाराज यांच्या पादुकांची गावातून टाळ-मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. ग्रामप्रदक्षिणा झाल्यानंतर सकाळी 10 वाजता निमोण नाका परिसरातून दिंडीचे संगमनेरकडे प्रस्थान झाले.

खांद्यावर भगव्या पताका व मुखातून हरिनामाचा गजर करत दिंडी मार्गस्थ झाली. महिला भाविकांच्या डोक्यावरील तुलसी वृंदावन सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. पायी दिंडी सोहळा संगमनेर, चंदनापुरी, कर्जुले पठार, घारगाव, बोटा, आळे फाटा, नारायणगाव, चौदा नंबर, कळम, पेठवस्ती, खेड, चाकण, मोशीमार्गे सोमवारी (दि.29) आळंदी येथे पोहोचणार आहेत. आळंदी येथील केळगावला दिंडीचा मुक्काम राहणार आहे. दहा दिवस चालणार्‍या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त बुधवारी (दि.1) सकाळी 10 वा. उत्तम भाबड महाराज यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल. त्यानंतर दिंडीचा समारोप होईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com