
नाशिक | Nashik
सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय (Ministry of Social Justice and Empowerment), भारत सरकार, तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य (Maharashtra) यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यामध्ये दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
अनुसूचित जातींकरिता असलेल्या योजना, त्यांची प्रभावी अंमलबजावणी, जनजागृती, नियम व कायदे (Laws) नागरीकांपर्यंत पोहचविण्यासाठी पुण्यात विचारमंथन होणार आहे.
28 फेब्रुवारी व 1 मार्च 2023 रोजी आयोजित या क्षेत्रीय कार्यशाळेत 12 राज्यांच्या सामाजिक न्याय विभागाचे (Department of Social Justice) मंत्री, मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव, सचिव, आयुक्त, व संचालक इत्यादी अधिकारी सहभागी होत आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) तसेच सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री, भारत सरकार ए. नारायणस्वामी आणि रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या उपस्थितीत या कार्यशाळेचे उद्घाटन होत आहे. याशिवाय केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्री डॉ. विरेन्द्र कुमार हे आभासी माध्यमातून उपस्थितांना संबोधित करणार आहेत. केंद्रीय राज्यमंत्री दोन्ही दिवस उपस्थित राहणार आहेत.