शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी कृषी विभाग शेतकऱ्यांच्या दारी
नाशिक

शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी कृषी विभाग शेतकऱ्यांच्या दारी

कृषी संजीवनी सप्ताहातून इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा सल्ला

Abhay Puntambekar

घोटी । जाकीर शेख Igatpuri / Ghoti

इगतपुरी तालुक्याला निसर्गदत्त देणगी असून पाणी-पाऊस,महामार्ग, रेल्वे,औद्योगिक क्षेत्र, व्यापार करता नजीकच्या मुंबई, नाशिक,पुणे अशा बाजारपेठ जवळपास उपलब्धता असून याचा तालुक्यातील शेतकरी बांधवांनी शेतीत नवनवीन तंत्रज्ञान वापरून विकास साधावा. पारंपरिक पद्धतीच्या पुढे जाऊन व्यावसायिक नजरेने शेती करावी यासाठी शेतीच्या बांधापर्यत शासनाच्या विविध योजना,माहिती,मार्गदर्शन, नियोजन करून "कृषी संजीवनी सप्ताह"माध्यमातून त्या इगतपुरी कृषी विभाग प्रयत्न करत आहे, त्याचा उपयोग शेतकरी बांधवांनी घ्यावा, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी शितलकुमार तंवर यांनी केले. बेलगाव तऱ्हाळे येथील कृषी सप्ताह कार्यक्रमात ते बोलत होते.

शेतकरी बांधवांना भात लागवडीसाठी नवीन यांत्रिककरणाची माहिती,कृषीपीक विमा,अपघात विमा योजना,पीएम किसान योजना,चार सूत्री पद्धत,युरिया ब्रिकेट वापर,खत वापर मात्रा,अनुदानित यांत्रिक औजारे,फळबाग लागवड, भाजीपाला पीक, विक्री,शेतकरी बचत गट,आदींबाबत यावेळी माहिती दिली.

यावेळी पं,स, माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना शासनाच्या विविध योजना,नवनवीन पीक पद्धती,लागवड,खत,हवामान बदल, ठिबक सिचन,पशुपालन योजना बाबत माहिती दिली, यावेळी सरपंच अशोक मोरे, उपसरपंच सौ सुवर्णा आव्हाड, ग्रा,पं सदस्य संतोष वारुंगसे,विजय कर्डक,हिरामण आव्हाड,अंकुश मोरे,कृषी अधिकारी भरते, पांडोळे,रुपाली बिडवे, चौधरी, विजय नवले,ग्रामसेवक सुनील वाहूळे,रमेश जगदाळे आदीसह रामभाऊ वारुंगसे,लक्ष्मण जगदाळे,संतोष वारुंगसे, अर्जुन वारुंगसे, चिंतामन आव्हाड,शशी बारवकर, तुकाराम वारुंगसे ,धनाजी वारुंगसे, निवृत्ती बोराडे,मधुकर आव्हाड, संजय वारुंगसे आदी शेतकरी उपस्थित होते यावेळी पीक विमा नोंदणी केलेल्या शेतकरी बांधवांना प्रमाणपत्र देण्यात आली.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com