File photo
File photo
नाशिक

रामभक्तांवर करण्यात आलेल्या अन्यायाचा निषेध

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

जुने नाशिक | प्रतिनिधी

अयोध्या राम जन्मभूमी येथे राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने नाशिक शहर पोलिसांकडून राम भक्तांवर करण्यात आलेल्या अन्यायाचा निषेध करीत याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मध्य नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी पत्र पाठवून भावना व्यक्त केले आहे.

भक्तांनी परवानगीची मागणी केली होती तरी रात्रीच्या वेळी भक्तांच्या घरी जाऊन परवानग्या नाकारण्यात आल्या, ही दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होता. तसेच ऐतिहासिक काळाराम मंदिराच्या भोवती बंदोबस्त लावण्यात आला.

दर्शन घेण्यासाठीचा छोटा झरोका देखील बंद करण्यात आला. ही वस्तुस्थिती मांडताना भक्तांनी दर्शन घेऊ नये म्हणून श्रीरामालाच अटक करण्याचा प्रकार झाल्याचे त्यांनी पत्रात स्पष्ट केले.

नाशिक कुंभ भूमित साधुसंतांना रामतीर्थ वर जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला हे अत्यंत दुर्दैवी असल्याची बाब आ. फरांदे यांनी निदर्शनास आणून दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com