उमराणे बाजार समिती अध्यक्षपदी देवरे

उमराणे बाजार समिती अध्यक्षपदी देवरे

उमराणे । वार्ताहर Umarne

येथील स्व. निवृत्तीकाका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Late. Retirement Agricultural Produce Market Committee) अध्यक्षपदी प्रशांत देवरे (Prashant Deore) यांची तर उपाध्यक्षपदी मिलिंद शेवाळे (milind shewale) यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.

निवड घोषीत होताच समर्थक कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून एकच जल्लोष केला. संचालक मंडळ पाठोपाठ अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणूक देखील बिनविरोध करण्याची परंपरा जपली गेल्याने या निर्णयाचे सभासदांसह ग्रामस्थांतर्फे कौतुक केले जात आहे.

येथील बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक (Market Committee Election) 15 जानेवारी रोजी होती त्यावेळी पारंपरिक विरोधक असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत देवरे व माजी सभापती विलास देवरे यांनी अर्ज दाखल केले होते.

4 जानेवारीला माघारीची तारीख होती. यावेळेस दोन दिवस अगोदरच कृषी राज्यमंत्री दादा भुसे (Minister of State for Agriculture Dada Bhuse) व आ डॉ राहुल आहेर (mla dr. rahul aher) यांनी निवडणूक (election) बिनविरोध करावी असे आवाहन केले होते.

त्यामुळे सर्वंच्या सर्व 18 जागांची बिनविरोध निवड झाली होती आज निवडणूक अधिकारी सुजय पोटे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक कार्यक्रम झाला दोन्हीही जागेसाठी एक एक अर्ज दाखल झाल्याने प्रशांत देवरे यांची अध्यक्षपदी व मिलिंद शेवाळे यांची उपाध्यक्षपदी यांची बिनविरोध निवड झाली निवड जाहीर होताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली

याप्रसंगी संचालक विलास देवरे, राजेंद्र देवरे, देवानंद वाघ, प्रा. सतीश ठाकरे, संदीप देवरे, सुनील देवरे, प्रवीण देवरे, प्रवीण आहिरे, दादाजी खैरनार, यशवंत ठाकरे, दिपक निकम, सुमनबाई पवार, अनिता बस्ते, वैशाली आहेर, बेबीबाई खैरनार, अंजली केदारे, दिलीप देवरे, डॉ. रामदास देवरे, काशिनाथ देवरे, भाऊसाहेब देवरे, शिवाजी देवरे, भिला देवरे, प्रमोद देवरे, किशोर जाधव आदी संचालकांसह सचिव नितीन जाधव, उपसचिव तुषार गायकवाड, कांदा व भुसार व्यापारी हमाल मापारी शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध पार पडताच नुतन पदाधिकार्‍यांसह संचालकांनी श्रीरामेश्वर भगवान मंदिरात श्रीफळ चढवून पुजा केली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येवून अभिवादन केले गेले. यानंतर ग्रामस्थांच्यावतीने नूतन अध्यक्ष-उपाध्यक्ष यांचा सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com