येवला | Yeola

येवला तालुक्यातील देवळाणे येथे सोन्याबापु महिपत जाधव (वय ४७ ,रा.देवळणे) यांनी आज रात्रीच्या १.३० वा राहत्या घरी आतून दरवाजे बंद करून मफलरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळी दरवाजा बंद असल्याचे निदर्शनास आल्या नंतर उत्तम महिपत जाधव यांच्या माहिती नुसार घटनास्थळी येवला ग्रामीण पोलीस निरीक्षक भवारी, ए.ऐस. आय.तांदाळकर पो.ह.हेंबाडे, पगार आदीं दाखल झाले.

त्यांनी घटनेचा पंचनामा केला. झालेल्या प्रकाराची आकस्मित मृत्यू ची नोंद करून शवविच्छेदन करण्यासाठी येवला ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी हिराबाई, आकाश व पवन अशी दोन मुलं आहेत. ते जागरण गोंधळासह मोल मजुरी करत असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच घटनेचे कारण अद्याप स्पष्ट नसुन पुढील तपास ए.ऐस.आय.तांदाळकर हे करत आहे.

सदर व्यक्ती ही कर्ज बाजारी पणास कंटाळून आत्महत्या केली असल्याची देवळाणे परिसरात चर्चा आहे. यामुळे परिसरात तीव्र शोक व्यक्त होत आहे.