ऐन पावसाळ्यात नाशकातील 'या' प्रभागात दुष्काळ

ऐन पावसाळ्यात नाशकातील 'या' प्रभागात दुष्काळ
पाणी

देवळाली कॅम्प | वार्ताहर Nashik

ऐन पावसाळ्यात नाशिक शहरातील देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वार्डमधील विविध भागात गेल्या दहा दिवसापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे....

नागरिकांना ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. याबाबत माजी नगरसेविका आशा गोडसे व शिवसेना तालुका संघटक चंद्रकांत गोडसे यांनी प्रशासनाला पत्र देऊन पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी केली आहे.

वॉर्ड क 4 मधील धुर्जड मळा, निकी सागर परिसर, गोडसे मळा, नक्षत्र सोसाईटी, शुगर, सतनाम सोसाईटी, गॅस गोडावून भाग यासह लॅमरोडच्या काही भागात गेल्या 10 ते 15 दिवसापासून पाणी पुरवठा सुरळीत होत नाही.

सद्या पावसाळा सुरू असून नदी पात्रात पुरेशे पाणी आहे. तांत्रिक अडचणीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली असेल तर ती तातडीने दूर करणे गरजेचे असल्याचे गोडसे यांनी प्रशासकीय अधिकारी उमेश गोरवाडकर यांना सांगितले.

याबाबत पाणी पुरवठा विभागाकडून तातडीने कार्यवाही करून पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com