देवळालीच्या मिलटरी हॉस्पिटलच्या पर्यायावर सकारात्मक चर्चा

देवळालीच्या मिलटरी हॉस्पिटलच्या पर्यायावर सकारात्मक चर्चा

नाशिक | प्रतिनिधी

जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येला नियंत्रणात आणण्यासाठी विविध पर्यायांची पडताळणी जिल्हा प्रशासनामार्फत केली जात असून त्याचाच एक भाग म्हणून देवळाली मिलिटरी हॉस्पिटलच्या पर्यायाचा विचार जिल्हा प्रशासन व मिलिटरी प्रशासन करत आहे. त्यादृष्टिने देवळालीच्या मिलटरी हॉस्पिटलच्या पर्यायावर ब्रिगेडिअर शक्तिवर्धन यांच्याशी संयुक्त पाहणीत सकारात्मक चर्चा झाली. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली...

जिल्ह्यातील वाढत्या करोना रुग्णांच्या परिस्थितीचा विचार करून आरोग्य यंत्रणेला विविध माध्यमातून बळकटी प्राप्त करून देण्याच्या दृष्टिने जिल्हा प्रशासनामार्फत विविध पर्यायांची पडताळणी केली जात आहे.

त्याचाच एक भाग म्हणून नुकतीच जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ब्रिगेडीअर शक्तिवर्धन व त्यांच्या सहकार्यांसोबत देवळालीच्या मिलीटरी हॉस्पिटलची संयुक्त रित्या पाहणी करून विविध पर्यायांवर सकारात्मक चर्चा केली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात हेदेखील उपस्थित होते.

सध्या देवळाली मिलिटरी हॉस्पीटलची क्षमता 114 पेशंटची असून त्यामध्ये 12 व्हेंटीलेटर्स, 20 हाय डिपेंडन्सी युनिट व 4 अतिदक्षता व सर्वसाधारण 90 बेड आहेत. या हॉस्पिटलला व्हेंटीलेटर्स, ऑक्सिजन व मनुष्यबळ उपलब्ध करून दिल्यास रुग्ण दाखल करता येतील काय यावर पर्यायांचा विचार करण्यात आला.

परंतू या हॉस्पिटलमध्ये मिलिटरी एरियाच्या बाहेरील रुग्णांना दाखल करण्यास मर्यादीत वाव आहे. त्यामुळे देवळाली मिलिटरी हॉस्पिटल प्रशासन व जिल्हा सामन्य रुग्णालय येथे अधिकची व्हेंटीलेटर्स, बेड तसेच त्या अनुषंगाने लागणारी आवश्यक असणारी साधन सामुग्री उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हा शल्य चिकित्सकांना देण्यात आल्या आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com