देवळाली किसान रेलची १७ हजार टन वाहतूक

देवळाली किसान रेलची
१७ हजार टन वाहतूक

नाशिकरोड | Nashik

देशातील पहिली कृषी रेल्वे गाडी असलेल्या देवळाली-दानापूर किसान रेलने आतापर्यंत शंभर फे-यांव्दारे १७ हजार ३३ टन नाशवंत शेती मालाची वाहतूक केली आहे.

७ ऑगस्ट २०२० ला देवळाली-दानापूर किसान रेल्वे सुरु झाली. १५ मार्च २०२१ पर्यंत किसान रेलने १७ हजार ३३ टन नाशवंत शेती उत्पादने १०० फे-यांमध्ये वाहून नेली.

करोना महामारीत या गाडीव्दारे देवळाली, नाशिक, मनमाड, जळगांव, भुसावळ, खंडवा या प्रमुख स्थानकातून फळे, भाज्या तसेच आवश्यक कृषी संबंधित वस्तूंची वाहतूक करण्यात आली.

किसान रेलने महाराष्ट्रातील अनेक लहान शेतक-यांच्या जीवनात परिवर्तन केले आहे. त्यांच्या उत्पन्नामध्ये मोठी वाढ झाली असून त्यांचे जीवनमान, उदरनिर्वाह, समृद्धी यात वाढ केली आहे. शेतक-यांचा प्रतिसाद वाढू लागल्याने देशभरात अशा किसान रेल गेल्या वर्षभरात सुरु करण्यात आल्या आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com