कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात  देवळाली राज्यात प्रथम स्थानी

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देवळाली राज्यात प्रथम स्थानी

देशात चौथ्या स्थानी ; गत वर्षीच्या तुलनेत 48 अंकांनी झेप

देवळाली कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाने Deolali Cantonment Board 'स्वच्छ देवळाली, हरित देवळाली' या आपल्या घोषणेवर सार्थकता दाखवली आहे, केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२१ Swachh Survekshan Abhiyan-2021 मध्ये देशात चौथा तर राज्यातील कॅन्टोन्मेंट मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे,गत वर्षीच्या तुलनेत 48 अंकांनी झेप घेतली आहे.

दर वर्षी देशभरात स्वच्छ सर्वेक्षण अभियान swachh sarvekshan abhiyan राबविण्यात येते, एकूण ६२ कॅन्टोन्मेंट बोर्डांपैकी देशात, देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाने त्यांच्या श्रेणीत चौथे स्थान मिळवले आणि महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. देवळाली कॅन्टोन्मेंट ने 2021 मध्ये अभूतपूर्व कामगिरी केली आहे, कारण गत वर्षी 2020 मध्ये देशात देवळाली चा क्रमांक 52 वा होता,त्या स्थानावरून थेट चौथ्या स्थानी उडी घेताना 48 अंकांची झेप घेतली आहे.

2020 मध्ये घसरलेला क्रमांक लक्षात घेऊन बोर्डाचे प्रशासन, नगरसेवक यांनी स्वच्छता बाबद विशेष मोहीम राबविण्यासाठी काम केले, 2021 च्या सर्वेक्षणात चांगली रँक मिळवण्यासाठी संपूर्ण टीमने सायक्तिक काम केले, सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने मंडळाच्या सदस्यांनी यशाची शिडी चढवली. घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे, कचरा वेचण्याचे ठिकाण विकसित करणे आणि स्वच्छता व स्वच्छतेबाबत रहिवाशांमध्ये जागृती करणे यासारख्या विविध पद्धती राबवल्या.

देशभरात अहमदाबाद कॅन्टोन्मेंट बोर्डाने कॅन्टोन्मेंट श्रेणीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. शहरांतर्गत, इंदूरने सर्वेक्षणात पाचव्यांदा 'इंडियाज क्लीनेस्ट सिटी'चा किताब पटकावला. माजी सीईओ अजय कुमार,विध्यमान सीईओ डॉ.राहुल गजभिये, डेप्युटी सीईओ संजय सोनवणे, आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता, आरोग्य निरीक्षक शिवराज चव्हाण, अतुल मुंडे, शाजेब सय्यद,या शिवाय कायमस्वरूपी व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन कचरा गोळा करणे,त्याची योग्य ती विल्हेवाट लावणे याकामी शर्थीचे प्रयत्न केले.

याचे सर्व श्रेय माजी सीईओ अजय कुमार,बोर्ड अध्यक्ष, आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता आणि शहर स्वच्छ आणि हरित ठेवण्यासाठी समर्पितपणे काम करणार्‍या सर्व स्वच्छता कामगारांना जाते. यापुढेही ही स्थिती सुधारण्यासाठी कठोर परिश्रम करत राहू.

- डॉ. राहुल गजभिये, मुख्य कार्यकारी अधिकारी,

गत वर्षी जेव्हा मी आरोग्य अधिकारी म्हणून जॉईन झालो तेव्हा मला या सर्व्हेक्षणाची माहितीही नव्हती. जेव्हा माझी संपूर्ण वार्षिक सर्वेक्षण प्रक्रियेशी ओळख झाली तेव्हा मी ठरवले की देवळाली करानसाठी काहीतरी करायचे आहे. आम्ही परिस्थिती सुधारण्यासाठी तांत्रिक गोष्टींवर लक्ष केंद्रित केले. स्वच्छतेच्या शाश्वत प्रणालीवर लक्ष केंद्रित केले आणि रहिवाशांमध्ये त्याबद्दल जागरुकता निर्माण केली. शहरातील नवीन कचरा पॉइंट विकसित करून घरोघरी कचरा गोळा करणे यामुळे आम्हाला देशात चवथे स्थान प्राप्त झाले. हे यश टीमवर्कचे आहे -

अमन गुप्ता, आरोग्य अधीक्षक,

माजी सीईओ अजय कुमार,बोर्ड अध्यक्ष, सर्व निवडून आलेले सदस्य, स्वच्छता कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी आणि संरक्षक कर्मचारी यांनी हा बहुमान मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. - भगवान कटारिया, माजी उपाध्यक्ष

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com