देवळाली कॅम्पचा आठवडे बाजार पूर्ववत

देवळाली कॅम्पचा आठवडे बाजार पूर्ववत

दे.कॅम्प। वार्ताहर Deolali Camp

गेल्या सात महिन्या पासून येथील आठवडे बाजार weekly market सुरू होण्याची प्रतीक्षा असलेल्या व्यावसायिक व नागरिकांनी करोनाचे coronaनियम शिथिल झाल्यानंतर दोन दिवसापासून बाजार पूर्ववत सुरू करण्यात आला आहे.

गत वर्षी ऑक्टोबर 2020 व यावर्षी मार्च 2021 महिन्यात देवळाली येथे भरणारा आठवडे बाजार पूर्वरत करण्यात आला होता. मात्र नियमांचे पालनावर व्यावसायिक व नागरिक भर देत नसल्याने तो पुन्हा बंद करण्यात आला होता. अखेर दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक व नागरिकांची मागणी लक्षात घेत बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राहुल गजभिये यांनी दि.25 ऑक्टोबर रोजी हा बाजार पुन्हा भरविण्यात यावा याविषयी जाहीर सूचना प्रसिद्ध केली होती.

दोन दिवसांपूर्वी व्यावसायिक व शेतकरी मोठ्या प्रमाणात येथील आठवडे बाजार परिसरात दाखल झाल्याने गेल्या सात महिन्यांपासून शुकशुकाट असलेल्या परिसरात गजबज असल्याचे चित्र पाहायला मिळाला. दिवाळी निमित्ताने हा बाजार सुरू झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. लामरोड परिसरात वाहतुकीला होणारा अडथळा लक्षात घेत व वारंवार विविध व्यावसायिक तसेच सामाजिक व राजकीय संघटनानी हा बाजार पूर्वरत सुरु करण्याची केलेल्या मागणीचा विचार करत कॅन्टोन्मेंट प्रशासनाने जाहीर सूचनेद्वारे याबाबत सूचित केले होते.

आठवडे बाजार गवळीवाडा परिसरात पूर्वीच्या जागेवर सुरू झाला असल्याने इतरत्र रस्त्याच्या कडेला दुकाने लावणार्‍या वर कारवाई करण्याची मागणी व्यापारी वर्गाने केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com