पुतण्यानेच मारला काकांच्या पैशांवर डल्ला

पोलिसांनी एका तासात लावला छडा
पुतण्यानेच मारला काकांच्या पैशांवर डल्ला

देवळाली कॅम्प | वार्ताहर | Deolali Camp

भगूर (Bhagur) येथे घरफोडीची (Robbery) तक्रार दाखल झाल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली देवळाली कॅम्प पोलिसांनी (Deolali Camp Police) अवघ्या तासाभरातच घरफोडीचा (Robbery) पर्दाफाश करत मुद्देमालासह गुन्हेगाराला अटक (Arrested) केली...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भगूर येथील अशोक दगडू बिरछे (रा. घर नं. ५८१, इंदीरा संकुल, मोठा गणपती जवळ) हे येथील आठवडे बाजारात त्यांचे बटाटा विक्रीकरीता गेले असता त्यांच्या अनुपस्थितीत कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या घराच्या खिडकीचा गज कापून घरात प्रवेश केला.

कपाटात ठेवलेली एकूण १ लाख ८६ हजार ७७० रुपयांची रोख रक्कम चोरट्याने लंपास केली, अशी तक्रार देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. या तक्रारीवरून देवळाली कॅम्प पोलिसांनी ही माहिती वरिष्ठांना देवून देवळाली गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस निरीक्षक कुंदन जाधव (Kundan Jadhav) यांनी घटनास्थळी भेट देवून पोलीस ठाणेकडील गुन्हेशोध पथकास प्रयत्न करून गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले. गुन्हेशोध पथकाने घटनास्थळाचे व घरांचे सीसीटीव्ही तपासले असता तक्रारदाराच्या घराजवळ एक जण संशयीतरित्या फिरताना आढळून आला.

संशयीताच्या शरिरयष्टीच्या आधारे देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने भगूर परिसरात त्याचा शोध घेवून माहिती घेतली असता हा संशयित स्वागत हॉटेलजवळ पेंटीग काम करताना मिळून आला.

त्या संशयिताला ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याची चौकशी केली असता , त्यासंशयित व्यक्तीने त्याचे नाव अविनाश देविदास बिरछे असे असल्याचे सांगून तो तक्रारदार यांचा पुतण्या असल्याचे सांगितले आणि त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी त्याच्याकडून चोरलेली रक्कम जप्त केली असून संशयितास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास गुन्हेशोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com