आईच्या अंत्ययात्रेत खांदेकरी झाल्या मुली, एकीने अग्निडागही दिला

आईच्या अंत्ययात्रेत खांदेकरी झाल्या मुली, एकीने अग्निडागही दिला

देवळाली कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

आईचे निधन झाल्यानंतर चारही मुलींनी आईच्या अंत्ययात्रेत खांदा दिल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, पाचव्या मुलीने अग्नीडागदेखील दिला. अशा प्रकारची घटना पहिल्यांदाच येथे घडल्यामुळे पंचक्रोशीत पाहिल्यांदाच घडली असून सामाजिक परिवर्तनाची ती नांदीच यानिमित्ताने घडल्याचे दिसून येते....

देवळाली कॅम्प येथील द्रौपदा बाई निकम (वय 85) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्यात दोन मुले व पाच मुली आहेत. दोन्ही मुले परगावी कामाला असल्याने अंतिम यात्रेत सहभागी होऊ शकले नाहीत.

द्रौपदा बाई निकम गेल्या 18 वर्षांपासून मुली व जावई त्यांचे सोबत राहत होत्या. त्या आठ वर्ष मुलगी शोभा पवार यांच्यासोबत त्यानंतर मोनीता लोखंडे या देवळाली हायस्कूल मध्ये शिक्षिका असलेल्या मुलीेकडे आठ वर्ष राहिल्या.

याशिवाय दुसऱ्या मुली सुनीता पगारे व माया जाधव यांच्याकडेही त्या राहायच्या. काही मुली दूर शहरात असल्या तरी आपल्या परीने आईचा सांभाळ करावयाच्या. त्याशिवाय जावई सुनील तेलूरे, सुशील जाधव, विलास पवार, राजेंद्र पगारे,नुतन शाळेचे पर्यवेक्षक कृष्णा लोखंडे यांनी देखील या मातेचा सांभाळ केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com