देवळालीच्या आमदार दहा दिवस होम क्वॉरंटाइन
नाशिक

देवळालीच्या आमदार दहा दिवस होम क्वॉरंटाइन

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिकरोड | देवळाली मतदार संघातील आमदार सरोज आहिरे या डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार दहा दिवस होम क्वॉरंटाइन झाल्या आहेत. त्यानी स्वत: ही माहिती दिली.

त्यानी दिलेल्या माहितीवरुन त्यांची बहीण ही मुंबई येथे वास्तव्यास आहे. 14 मे ला त्यांच्या बहिणीच्या पतीचे निधन झाले असल्याने त्याना व त्यांच्या परिवारास मुंबई येथे धार्मिक विधीसाठी बारा दिवस जावे लागले.

काल मुंबईवरुन नासिकरोडला त्यांच्या निवासस्थानी आल्यावर आ. सरोज आहिरे यानी प्रोटोकॉलनुसार डॉक्टरांना कळऊन तपासणी केली. डॉक्टरांनी आ.आहिरे व त्यांच्या परिवारास पुढील दहा दिवस होम क्वॉरंटाइनचा सल्ला दिला. त्यानुसार आ. आहिरे होम क्वॉरंटाइन आहेत.

पुढे आमदार आहिरे यानी सांगितले की, देवळाली मतदार संघात मला पुढिल दहा दिवस फिरता येणार नसल्याने व मतदार संघात कामे करता येणार नसल्याने याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. तरी कोणास काही देवळाली मतदार संघात अडचण असल्यास मोबाईलवर संपर्क साधावा. घरात राहा सुरक्षित राहा असा सल्ला त्यानी देवळाली मतदार संघातील बांधवांना दिला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com