Photo Gallery : देवळाली कॅम्पचे कपडा मार्केट हाऊसफुल्ल; शहरातही गर्दी वाढली

Photo Gallery : देवळाली कॅम्पचे कपडा मार्केट हाऊसफुल्ल; शहरातही गर्दी वाढली

देवळाली कॅम्प | वार्ताहर

'स्वस्त कपडे हवे असतील तर देवळाली कॅम्पच्या लेविट मार्केटमध्ये जाऊन या' इतके प्रसिद्ध असलेले देवळाली कॅम्पचे हे मार्केट लॉकडाऊन उघडल्यानंतर हाऊसफुल्ल झाले आहे. कपडे अत्यावश्यक वस्तूंमध्ये येत नसले तरीदेखील कमी अत्यावश्यक असलेल्या कपड्यांच्या खरेदीसाठी सध्या मार्केटमध्ये झुंबड उडाली आहे...

कॅम्प परिसरात नागरिकांची गर्दी दिसू लागल्यामुळे अर्थचक्राला गती मिळाली आहे. विशेष म्हणजे, पंचक्रोशीतून याठिकाणी खरेदीसाठी नागरिक येत असल्याचे दिसून येत आहे.

मार्केटसोबत शहरातही मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी पाहायला मिळते आहे. अनेक दिवसांपासून ओस पडलेले रस्ते आता गर्दीने फुलले आहेत. तर चौकाचौकातही नागरिकांची गर्दी झाल्यामुळे कॅम्प परिसर पुन्हा एकदा हवाहवासा वाटू लागला असल्याचे चित्र दिसते आहे.

दरम्यान, शिथिलता मिळाली म्हणून नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये, सामाजिक अंतराचे भान पाळावे शासनाने घालून दिलेल्या वेळेत आपली खरेदी आटोपत घराकडे तत्काळ जावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com