मतदानासाठी देवळ्यात रांगा; सकाळच्या सत्रात झाले 'इतके' मतदान

मतदानासाठी देवळ्यात रांगा; सकाळच्या सत्रात झाले 'इतके' मतदान

देवळा | प्रतिनिधी

देवळा शहरात सकाळी साडेसात वाजेपासून शांततेत मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात अनेक मतदान केंद्रांवर रांगा लागलेल्या आहेत. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत ३५.७३% टक्के मतदान झाले....

आज पर्यंतच्या इतिहासात प्रथमच मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त देवळा शहरात लागलेला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. ग्रामीण पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांनी नुकतीच येथील मतदार केंद्र परिसरात भेट दिली.

मतदानासाठी येणाऱ्या मतदारांचे स्वागत करण्याठी महीला उमेदवार व कार्यकर्ते यांचीही मांदियाळी याठिकाणी बघायला मिळते आहे.

देवळ्यात 11 जागांसाठी 38 अर्ज आले होते. त्यात 5 जणांनी माघार घेतली. त्यामुळे 33 जणांमध्ये लढत होत आहे.

देवळा नगरपंचायतमध्ये १७ पैकी चार ओबीसी जागा व दोन बिनविरोध जागा वगळता ११ जागांवर निवडणुक होत असून उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत झालेले एकूण मतदान

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com