
दहिवड | वार्ताहर Dahiwad
करोनाच्या प्रादुर्भावामुळे (Covid Outbreak) मागील दोन वर्षांपासून राज्यातील बऱ्याच शाळा ऑनलाइन पद्धतीने (School Online) सुरू होत्या. शासनाने चालू शैक्षणिक वर्षाची (Education year) सुरुवात आज (दि15) पासून केली असून आजपासून राज्यातील पहिली ते दहावीच्या सर्व शाळा उघडल्या आहेत....
देवळा तालुक्यातील दहिवड (Dahiwad Tal Deola) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज पहिल्या दिवशी नवीन दाखल विद्यार्थ्यांचे बैलगाडीत मिरवणूक (student on bullock cart) काढून स्वागत करण्यात आले. तसेच नवीन प्रवेशित विद्यार्थिनींचे पहिले पाऊल कागदावर उमटवत त्यांचे औक्षण करण्यात येऊन गुलाब पुष्प, चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी केक देखील कापण्यात आला. शासनाच्या वतीने पुरविण्यात आलेल्या मोफत गणवेश व पाठ्यपुस्तकांचे विद्यार्थ्यांना उपस्थित पालक व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष-उपाध्यक्ष यांच्या हस्ते वाटप करण्यात येऊन शालेय पोषण आहारात मिठाईचे वाटप करून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मेजवानी देखील देण्यात आली.
कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा उपसरपंच मनेश ब्राह्मणकर, उपाध्यक्ष पूजा पवार, मुख्याध्यापक अशोक सोनवणे, शिक्षक नंदू शिरसाठ, लता निकम, प्रमिला गायकवाड, बापू सोनवणे, तुळशीराम सोमवंशी, निर्मला सुर्यवंशी, रामदास शिरसाठ, अलका बिरारी, नीलिमा पगार, अंगणवाडी सेविका,बीआरसिच्या प्रियंका पगार, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.