कोविड सेंटरमधील आरोग्य कर्मचाऱ्यांना आमरस पुरणपोळीचा पाहुणचार

कोविड सेंटरमधील आरोग्य कर्मचाऱ्यांना आमरस  पुरणपोळीचा पाहुणचार

देवळा | विशेष प्रतिनिधी

करोना काळात रुग्णसेवेत असलेल्या आरोग्य कर्मचारी यांना सणासुदीला सुद्धा सुट्टी घेता येत नाही. त्यामुळे सण, उत्सव साजरा करता येत नाहीत. यामुळे देवळा येथील राम केटरर्सच्या वतीने कोविड केअर सेंटरच्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना पुरणपोळी व आमरसाचे जेवण देण्यात आले...

करोना काळात रुग्णांच्या सेवेत अहोरात्र सेवा करणारे आरोग्य कर्मचाऱ्यारी सद्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे खुपच तणावाखाली काम करत आहेत. सण उत्सव घरी साजरे करता येत नाही. कुटुंबाला वेळ देता येत नाही.

आज अक्षय तृतीया म्हंटल्यावर घरोघरी पुरणपोळी व आमरसचा बेत आखला गेला होता. मात्र करोना काळात सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचारी यांना रुग्णांच्या सेवेत असल्याने या सणाचा आनंद घेता येत नाही.

ही बाब लक्षात घेऊन आज (दि.१४) राम केटरर्सचे दावल भदाणे, दिनकर भदाणे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत देवळा येथील कोविड केअर सेंटरच्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना पुरणपोळी व आमरस जेवण दिले.

याप्रसंगी किसान युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष यशवंत गोसावी, संजय जगदाळे, खुशाल पवार, प्रकाश भदाणे, संजय खैरे, अविनाश बागुल, बाला भदाणे आदी सहकारी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com