
देवळा | प्रतिनिधी Deola
देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी माघारीच्या अंतिम दिवशी एकूण १८ पैकी आठ जागा बिनविरोध झाल्या तर उर्वरित दहा जागांसाठी १८ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले. १२९ उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांपैकी १०३ माघारी झाल्या.
देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक बिनविरोध होणेकामी सर्व सर्वपक्षीय नेत्यांना एकत्रित आणत देवळा पत्रकार संघाने आवाहन केले असता सदर निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर असताना एक-दोन जागांचा तिढा न सुटल्याने १० जागांसाठी निवडणूक लागली. यात बाजार समितीच्या सर्वसाधारण सोसायटी गटाच्या सात जागांसाठी तेरा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत तर व्यापारी गटाच्या दोन जागांसाठी तीन व हमाल मापारी गटाच्या एका जागेसाठी दोन उमेदवार समोरासमोर उभे ठाकले आहेत.
बिनविरोध झालेल्या उमेदवारांची गटनिहाय नावे-
सोसायटी सहकारी संस्थेच्या मतदारसंघात महिला राखीव जागेवर धनश्री केदा आहेर व विशाखा दीपक पवार यांची तसेच इतर मागास वर्ग गटात दिलीप लालजी पाटील आणि विजा-भज मध्ये दीपक काशिनाथ बच्छाव यांची बिनविरोध निवड झाली. याशिवाय ग्रामपंचायत मतदारसंघात सर्वसाधारणमध्ये रेश्मा रमेश महाजन व शाहू गंगाधर शिरसाठ, अनुसूचित जाती व जमाती मध्ये भास्कर बाबुराव माळी तर आर्थिक दुर्बल गटात शीतल योगेश गुंजाळ यांची बिनविरोध निवड झाली.
निवडणूक लागलेल्या सोसायटी मतदारसंघात सर्वसाधारण सात जागांसाठी तेरा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांची नावे याप्रमाणे..अरुण पोपट आहिरे, शिवाजी दोधा आहिरे, महेंद्र बळवंत आहेर, योगेश शांताराम आहेर, अभिजित पंडितराव निकम, शशिकांत श्रीधर निकम, पोपट महादू पगार, भाऊसाहेब निंबा पगार, अभिमन वसंत पवार, शिवाजीराव भिका पवार, कडू भिला भदाणे, वसंत राजाराम सूर्यवंशी, विजय जिभाऊ सोनवणे अशी आहेत. तर व्यापारी गटातील दोन जागांसाठी अमोल महारू आहेर, निंबा वसंत धामणे, संजय दादाजी शिंदे आणि हमाल-मापारी गटाच्या एका जागेसाठी विजय नारायण आहेर व भावराव बाबुराव नवले समोरासमोर लढणार आहेत.
२८ एप्रिल रोजी होत असलेल्या या निवडणुकीचा निकाल २९ एप्रिल रोजी लागणार असल्याने कोण बाजी मारणार याकडे देवळा तालुकावासीयांचे लक्ष लागून आहे.