नाशकात डेंग्यूच्या रुग्णांत वाढ

नाशकात डेंग्यूच्या रुग्णांत वाढ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरात काही दिवसांपासून पावसाने (Rain) दडी मारल्यामुळे मानवी शरीरास बाधक असे वातावरण निर्माण झाले होते. परंतु आता काही प्रमाणात पाऊस बरसत असल्याने शहरात डास, मच्छर यांचा प्रादुर्भाव वाढल्याने डेंगू, टायफॉईड, मलेरिया, थंडी, ताप, आदींसह विविध प्रकारच्या पावसाळी आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे...  

या महिन्यात सुमारे ४५० ते ५०० संशयित रुग्ण आढळून आले. यामध्ये ८० ते ९० रुग्णांना डेंग्यू झाल्याचे आढळून आले. शहरात मलेरिया,डेंग्यू व असून इतर पावसाळी आजारदेखील वाढले आहे. तसेच जागोजागी कचरा साचून दुर्गंधी वाढत असल्यामुळे आजारांचे प्रमाण वाढत आहे. डेंग्यू आणि मलेरियाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जंतुनाशक फवारणी करण्याची आवश्यकता असल्याचे दिसून येत आहे. 

नाशकात डेंग्यूच्या रुग्णांत वाढ
जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी; शेतकरी सुखावले, पिकांना जीवदान

डेंग्यूपासून बचावासाठी अशी घ्या काळजी

डेंगूपासून बचाव करण्यासाठी दिवसा पायमोजे घालावेत. घरातील कुंड्या, फ्रीजच्या खालील ट्रे, फुलदाणी, एअर-कंडिशनर, तसेच उघड्यावरील टायर, फुटके डबे, कौले, करवंटया, गच्चीवर पाणी साठण्याच्या जागा, झाकण उघडे राहिलेल्या पाण्याच्या टाक्या आदीत पाणी साठल्यास तिथे डेंग्यूचे डास होतात. हे सर्व टाळायला हवे. घरातील पाण्याची पिंपे आठवड्यातून एकदा पूर्णपणे रिकामी करून धुवायला हवीत. 

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

नाशकात डेंग्यूच्या रुग्णांत वाढ
चाचडगाव टोलनाकाप्रश्‍नी धनराज महालेंनी घेतली पालकमंत्र्यांची भेट
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com