चांदोरीत माती आणि पाणी परीक्षणाची प्रात्यक्षिके

चांदोरीत माती आणि पाणी परीक्षणाची प्रात्यक्षिके

निफाड। प्रतिनिधी Niphad

कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय ( Karmayogi Dulaji Sitaram Patil Agricultural College )नाशिकच्या विद्यार्थीनींनी चांदोरी येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव आणि कृषी उद्योग आधारित कार्यक्रमाअंतर्गत माती आणि पाणी परीक्षणाची प्रात्यक्षिके ( Demonstrations of soil and water testing ) शेतकर्‍यांना करून दाखवत खरीप हंगामातील पिकांचे नियोजन यावर माहिती दिली.

माती परीक्षण कसे करावे, त्याचे फायदे व माती परीक्षण केल्यामुळे शेतकर्‍यांना होणारे पिकांचे नुकसान कशा प्रकारे कमी करता येते याबद्दल सोप्या व साध्या शब्दात सांगितली. याप्रसंगी प्रकाश काळू ढेमसे, सुभाष काळू ढेमसे, विष्णू पोपट टर्ले, कैलास संतू शिंदे आदी शेतकरी उपस्थित होते. माती परिक्षणासाठी लागणारे मातीचे नमुने कसे घ्यावे. त्यांची तपासणी कशी आणि कुठे करावी याची माहिती दिली.

तसेच माती परीक्षण करतांना कोणत्या परिमाणांचा आढावा घेतला पाहिजे आणि कोणत्या बाबींसाठी माती परीक्षण केले पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले. बागपिकांतर्गत येणार्‍या पिकांच्या मातीचे नमुने आणि त्यांचे परिक्षण कसे केले पाहिजे आणि हंगामी पिकांसाठी मातीचे नमुने कशाप्रकारे घेतले जातात याचे उदाहरणांसह मार्गदर्शन करण्यात आले.

या उपक्रमा दरम्यान कृषी कन्या ऋतुजा विजयकुमार गजभिये, मधुरा राजेंद्र देशमुख, पूजा प्रकाश ढेमसे यांनी माती आणि पाणी परिक्षणासाठीचे नमुने घेतले. तसेच त्यांना मविप्र सरचिटणीस. नीलिमा पवार, शिक्षणाधिकारी डॉ.एन.एस. पाटील, प्राचार्य डॉ.आय.बी. चव्हाण, प्रा.सी.एस. देसले, प्रा.एस.यु. सूर्यवंशी, प्रा.एन.एन. गोसावी, प्रा.एस.बी. सातपुते यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com