स्टेडीयमच्या नामकरणासाठी निदर्शने

स्टेडीयमच्या नामकरणासाठी निदर्शने

देवळाली कॅम्प । प्रतिनिधी Devlali Camp

दिल्ली येथील मेट्रो स्टेशनला शिवाजी स्टेडीयम असे एकेरी नाव देण्यात आल्यामुळे संतप्त झालेल्या नाशिकचे खा. हेमंत गोडसे यांनी दिल्ली येथे जाऊन स्टेडियमच्या नामकरणासाठी निदर्शने केली. यावेळी स्टेडियमला छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम या नावाचे फलक लावले. याप्रसंगी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वेळकाढूपणाचा खा. गोडसेंनी निषेध नोंदवित आता तरी स्टेडिमच्या नामकरणाबाबत रितसर घोषणा करावी, अशी मागणी केली.

याबाबत खा. गोडसे यांनी दिलेली माहिती अशी की, छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहेत. देशभरात छत्रपतींचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. असे असतांना दिल्ली येथील मेट्रो स्टेशनचे नाव शिवाजी स्टेडियम असे एकेरी ठेवण्यात आले आहे, ही लाजीरवाणी बाब असल्यामुळे या स्टेडियमचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम असे सन्मानार्थी नामकरण करण्यात यावे. याबाबत शिवसेनेच्या माध्यमातून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे पाठपुरावा केला आहे.

मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे अजनूही स्टेडियमला शिवाजी स्टेडियम अशा एकेरी नावाने ओळख आहे. यामुळे संतप्त झालेल्या खा. गोडसे यांनी पदाधिकार्‍यांसह दिल्लीतील स्टेडियमबाहेर प्रखर निदर्शने केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com