
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शेतकऱ्यांच्या व्यथा सरकार दरबारी मांडण्याबरोबरच राज्य सरकारला जाग यावी. शेतकऱ्यांना बांधावर जाऊन त्वरित आर्थिक मदत मिळावी व शेतमालाला हमी भाव मिळावा, या मागणीसाठी नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्यावतीने गुरुवारी (दि.१६) राज्य सरकारचा निषेध करत कांद्याची 12 फूट प्रतिकृती उभारून शेतकऱ्याची व्यथा मांडत निदर्शने करण्यात आली...
काँग्रेस भवन येथे हातात कांदे घेत निदर्शने करण्यात आली. यावेळी नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड,नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष डॉ वसंत ठाकूर, माजी नगरसेविका वत्सला खैरे, हनीफ बशीर, लक्ष्मण धोत्रे, शिराज जीन, बबलू खैरे, सुनील आव्हाड, विजय पाटील, मुन्ना ठाकूर, कैलास महाले, अल्तमश शेख,
गौरव सोनार, कामिल इनामदार, धोंडीराम बोडके, अशोक लामगे, सिद्धार्थ गांगुर्डे, उमेश चव्हाण, संतोष हिवाळे, जावेद इब्राहिम, जगदीश वर्मा, दाऊद शेख, हेमंत परदेशी, अनिल बेग, नदीम शेख, जुलीताई डिसूजा,अरुणा आहेर, कुसुमताई चव्हाण, समीना पठाण,गुढी आप्पा, साजीया शेख, गणेश धातोडकर, अनिल आंबेकर, बाळा कदम, राजकुमार झेप, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.