'या' कारवाई विरोधात राष्ट्रवादीचे निदर्शन

'या' कारवाई विरोधात राष्ट्रवादीचे निदर्शन

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Nationalist Congress Party) अध्यक्ष आ. जयंत पाटील (MLA Jayant Patil) यांच्यावर विधानसभेत करण्यात आलेल्या निलंबन (Suspension) कारवाईचे संतप्त पडसाद मालेगावी उमटले.

विरोधी पक्षाचा (opposition party) आवाज दाबण्याचे काम राज्य सरकार (state government) करीत असल्याचा आरोप करीत शहर- तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी महात्मा गांधी पुतळ्यासमोर निदर्शने करत शिंदे फडणवीस सरकारचा निषेध केला.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) यांना उद्देशून असंसदीय शब्द वापरल्याने आ. जयंत पाटील (MLA Jayant Patil) यांच्यावर हिवाळी अधिवेशनासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठीच ही कारवाई केली गेल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज मोसम पुलावरील महात्मा गांधी पुतळ्यासमोर तालुका अध्यक्ष संदीप पवार, प्रांतिक सदस्य जयंत पवार युवक, राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस दिनेश ठाकरे, यांच्या नेतृत्वाखाली निदर्शन करीत राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.

नागपूर (nagpur) अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार (Leader of Opposition Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधी पक्ष एकजुटीने धारेवर धरत असल्याने राज्य सरकार घाबरले आहे. तसेच आ.जयंत पाटील यांच्या अभ्यासपूर्ण भाषणाने सरकारच्या पायाखालची वाळू सरकत असल्यानेच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली गेली असल्याचा आरोप डॉ. जयंत पवार, संदीप पवार यांनी यावेळी बोलताना केला.

यावेळी आंदोलकांतर्फे नायक तहसीलदार व्यंकटेश तृप्ते यांना निवेदन (memorandum) देण्यात आले. या आंदोलनात विजय दशपुते, विनोद चव्हाण, किशोर इंगळे, धर्मा भामरे, जयेश अहिरे, नंदकुमार सावंत, सागर जाधव, राजेंद्र पवार, विजय पवार ,प्रकाश वाघ, शकील बेग,धनंजय पाटील,सतीश पवार, बबन पवार, भाऊसाहेब बोराळे, डॉ. धीरेंद्र चव्हाण, हर्षल पवार,जितेंद्र खैरनार,असलम अन्सारी आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com