
चांदोरी । वार्ताहर Chandori
मान्सूनपूर्व पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा आपत्ती प्राधिकरण (Nashik District Disaster Authority,), नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीच्या वतीने पूरपरिस्थितीत ( flood Situation ) कराव्या लागणार्या कसरतीचे सराव शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या (Disaster Management Committee) स्वयंसेवकांनी बुडणार्या व्यक्तीला कसे वाचवावे, बोट चालवणे, प्रथमोपचार पद्धती यांचे प्रात्यक्षिक करण्यात आले.
आपत्ती व्यवस्थापन समितीच्या वतीने उन्हाळी विशेष पोहण्याचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यात पोहण्याच्या स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या मुलांना प्रशस्तीपत्रकाचे वाटप करण्यात आले. धरण क्षेत्रात नेहमी होत असलेल्या पावसामुळे गोदाकाठ भागात नेहमीच पूरपरिस्थिती निर्माण होत असते. त्या पार्श्वभूमीवर तयारी म्हणून सर्व उपलब्ध साधनांची उपयोगिता, पुरेसा सराव माहिती यासाठी मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले.
तसेच 2019 च्या महापुरात आपत्ती व्यवस्थापन समितीच्या वतीने 64 लोकांचे प्राण वाचवण्यात आले होते, त्याबद्दल जिल्हा पोलीस यंत्रणेच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन समिती सदस्यांना सन्मानित केले गेले. यावेळी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली तसेच तहसीलदार शरद घोरपडे, पोलीस निरीक्षक अकबर पटेल, सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.वाय. कादरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कोशिरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.ज्योती फडोळ, सहाय्यक अभियंता विशाल मोरे, सरपंच वैशाली चारोस्कर, माजी सरपंच देवराम निकम, कृषी सहाय्यिका श्रीमती सोनवणे आदींसह आपत्ती समितीचे सदस्य उपस्थित होते.