'या' मागणीसाठी विधानभवनासमोर संतप्त शेतकर्‍यांची निदर्शने

'या' मागणीसाठी विधानभवनासमोर संतप्त शेतकर्‍यांची निदर्शने

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

तालुक्यातील बोरी-अंबेदरी धरणातून (Bori-Ambedari Dam) बंदिस्त जलवाहिनी कालव्यास विरोध करणार्‍या संतप्त शेतकर्‍यांनी (farmers) स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधी व प्रशासन यंत्रणा लक्ष देत नसल्याने आज नागपूर (nagpur) येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेसमोर (Legislative Assembly) धरणे आंदोलन (agitation) छेडत निदर्शने केली.

आंदोलनकर्त्या शेतकर्‍याची विरोधी पक्षनेते अजित पवार (Leader of Opposition Ajit Pawar), ज्येष्ठ नेते आ. छगन भुजबळ (chagan bhhujbal), प्रहारचे आ. बच्चू कडू (MLA Bacchu Kadu), शिवसेना नेते आ. भास्कर जाधव, शेकाप नेते आ. जयंत पाटील, आ. एकनाथ खडसे आदी नेत्यांनी भेट घेत चर्चा केली. 50 दिवसांपासून आम्ही धरणावर महिला कुटूंबासह आंदोलन करत आहोत. मात्र आमच्या मागणीची दखल घेतली जात नाही.

बंदिस्त जलवाहिनीमुळे (Clogged aqueduct) शेती नष्ट होवून आम्ही उध्वस्त होणार आहोत. सर्व शेतकर्‍यांना पाणी मिळाले पाहिजे मात्र कालवा झाल्यापासून त्याची दुरूस्ती न झाल्याने पाण्याची गळती होत आहे. त्यामुळे दुरूस्ती करत कालव्याव्दारे पाणीपुरवठा (Water supply) करावा, अशी न्यायोचित मागणी आम्ही करत असतांना देखील आमचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप यावेळी आंदोलक शेतकर्‍यांनी करत आम्हाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करण्याचे साकडे वरिल नेत्यांना घातले.

अंबेदरी धरणातून शेती सिंचनासाठी (Agricultural irrigation) पाटकालव्याव्दारेच पुर्वीसारखे पाणी द्यावे या मागणीसाठी दहिदीसह टिंगरी, वनपट, राजमाने आदी भागातील शेतकरी धरणावर आंदोलन करत जलवाहिनीस विरोध करीत आहेत. मात्र पाटबंधारे विभागातर्फे मंजूर असलेल्या बंदिस्त जलवाहिनी कालव्याच्या कामास टोकडे, अस्ताने शिवारातून प्रारंभ करण्यात आला आहे.

50 दिवसापासून आंदोलन सुरू असतांना देखील पालकमंत्री दादा भुसे यांच्या दबावाखाली पाटबंधारे विभाग व प्रशासन यंत्रणा जलवाहिनीचे काम रेटून नेत असल्याने व आंदोलनाची दखल घेत नसल्याने आंदोलक शेतकर्‍यांनी आज नागपूर येथे धाव घेत विधानभवनासमोर धरणे आंदोलन छेडत निदर्शने करत जय जवान जय किसान, शेतकर्‍यांना न्याय मिळालाच पाहिजे, जलवाहिनी योजना बंद करा अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. आंदोलक शेतकर्‍यांनी जलवाहिनी रद्द करण्यासाठी शासनास निवेदन सादर केले. यावेळी शासनातर्फे पाटबंधारे विभागाच्या सचिवांनी आंदोलक शेतकर्‍यांना चर्चेसाठी बोलवले आहे.

पाटकालव्याव्दारे पाणी न दिल्यास आम्ही आंदोलन अधिक तीव्र करणार असून मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आंदोलन करणार असल्याचा इशारा देत शेतकर्‍यांनी जलसंपदामंत्री फडणवीस यांच्याशीच याप्रश्नी चर्चा करण्याची भुमिका जाहिर केली. या आंदोलनात भुषण कचवेसह समाधान कचवे, नितीनचद्र ठाकरे, प्रदीप शिंदे, अनिल बोरसे, निवृत्ती अहिरे, जगदीश कचवे, मनोज कचवे, गणेश कचवे, विकी कचवे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com