सरकारकडून लोकशाहीची गळचेपीः पवार

राष्ट्रवादीचे नेते शेख रशीद यांचा सत्कार
सरकारकडून लोकशाहीची गळचेपीः पवार

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

केंद्र व राज्य सरकार अल्पसंख्यांक समाजाशी भेदभाव करीत जातीयवाद वाढविण्याचे राजकारण (politics) करीत असून या विरोधात बोलणार्‍यांचा आवाज दाबण्याचे काम केले जात आहे.

मात्र संविधान (Constitution) व लोकशाहीची (Democracy) हत्त्या करण्याचे हे षडयंत्र राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) उधळून लावत अल्पसंख्यांकांसह सर्व समाजाच्या हिताचे रक्षण करण्यास सक्षम आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा घणाघात करीत विरोधी पक्षनेते अजित पवार (Leader of Opposition Ajit Pawar) यांनी देश व राज्यातील हे चित्र बदलण्यासाठी आगामी निवडणुकांमध्ये (election) या जातीयवादी शक्तींना दूर करावे लागणार असून यासाठी मालेगावकरांनी महत्वाची भुमिका बजविण्याचे आवाहन केले.

शहरातील ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ. शेख रशीद (Senior leader of NCP, former A. Sheikh Rasheed) यांच्या राजकीय (politics) व सामाजिक वाटचालीस 40 वर्षे पुर्ण झाल्याबद्दल येथील नुरबाग मैदानावर आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करतांना विरोधी पक्षनेते अजित पवार (Leader of Opposition Ajit Pawar) बोलत होते. यावेळी केंद्र व राज्य शासनातर्फे सुरू असलेल्या जातीयवाद पोषक राजकारणावर पवार यांनी हल्ला चढविला.

ख्यातनाम शल्य विशारद डॉ. सईद अहमद फैजी या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, विधानसभा उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ, आ. दिलीप बनकर, माजी आ. आसिफ शेख, जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, उमेश पाटील, राजेंद्र भोसले, प्रसाद हिरे, प्रदेश सचिव दिनेश ठाकरे, संदीप पवार, विनोद चव्हाण, शकील बेग, असलम अन्सारी आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून व्यासपिठावर उपस्थित होते.

विकासासाठी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) शासन काळात आपण दिलेला निधी सत्तेवर येताच रोखण्याचे काम राज्य सरकारने केले आहे. या मनमानी विरोधात उच्च न्यायालयात (High Court) दाद मागितली असून निश्चित दिलासा मिळेल, असे स्पष्ट करत पवार पुढे म्हणाले, अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक महत्वपुर्ण निर्णय घेतले. यंत्रमाग वीजेसाठी अडीच हजार कोटीची सवलत दिली. तर महामंडळाचा निधी पाचशे वरून सातशे कोटी केला. विद्यार्थ्यांना (students) उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती (scholarship) देण्याचा निर्णय घेतला गेला.

अल्पसंख्यांकच नव्हे सर्व समाजाच्या हिताचे निर्णय महाविकास आघाडीने घेतले. मात्र केंद्र व राज्य सरकारतर्फे सत्तेसाठी अल्पसंख्यांक समाजाला लक्ष केले जात आहे. दिल्लीतील खासदार विशिष्ट समाजाच्या दुकानदारावर बहिष्काराची भाषा करतो तर मुलांना मॉब लिचिंगसारख्या (Mob Licking) कृत्यातून लक्ष्य केले जात असल्याने या जातीयवादी शक्तींना रोखण्याची वेळ आली असल्याचे पवार यांनी सांगितले.

एमआयएमचे नाव न घेता हा पक्ष भाजपची (BJP) बी टीम असल्याचे स्पष्ट करत पवार पुढे म्हणाले, या पक्षाचा येथील आमदार मुख्यमंत्री शिंदे व भाजपबरोबर फिरतात त्यांच्या व्यासपिठावर बसतात. हा मालेगावकरांशी धोका आहे. मुस्लीम मतांचे विभाजन करण्यासाठीच या बी टिमचा कट असल्याने जनतेने त्यांच्यापासून सावध राहावे, असे आवाहन केले

राजकीय व सामाजिक क्षेत्रात 40 वर्षे काम करून लोकांचा विश्वास जिंकणे व ते टिकवून ठेवणे हे सोपे काम नाही. लोकप्रतिनिधींना पाच-दहा वर्षातच जनता विसरते. मात्र शेख रशीद त्यास अपवाद ठरले ही खूप मोठी उपलब्धी असून 40 वर्षाच्या या कष्टपुर्ण वाटचालीचा होत असलेला सन्मान निश्चितच गौरवास्पद असून या सोहळ्याने बारामतीकरांच्या प्रेमाची आठवण करून दिल्याचे सांगत पवार यांनी नगराध्यक्ष ते राज्यमंत्री पदापर्यंत शेख रशीद यांनी शहरात केलेल्या विविध विकासकामांची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

प्रगतीचा नाही तर हिंदू-मुस्लीम कसे भांडतील याचा विचार करण्यातच केंद्र व राज्य सरकार धन्यता मानत आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना असल्यामुळे हिंदू मते मिळणार नाहीत म्हणूनच सरकार पाडले गेल्याचे टिकास्त्र सोडत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी कटकारस्थान करून हे सरकार सत्तेवर आले असले तरी आगामी काळात राष्ट्रवादी-शिवसेना-काँग्रेसचा झंझावात दिसून येईल. या वादळात भाजप-शिंदे सेनेची धुळधाण अटळ आहे. भाजपला धडा शिकविण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असून ती निश्चित दाखवून दिली जाईल, असा इशारा येथे बोलतांना दिला.

राजकारणाचा स्तर घसरल्याने देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सामान्य माणसाच्या अपेक्षांकडे दुर्लक्ष केले जात असून एनआरसी सारखे कायदे आणून समाजात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टिका करत आ. पाटील पुढे म्हणाले, बिल्कीसबानोवर अत्याचार करणार्‍यांची जन्मठेप माफ केली जावून सोडले जावून मिठाई वाटून त्यांचे स्वागत केले जाते. हिजाबवरून हेतुपुरस्पर वाद उभा केला जात असल्याचा आरोप केला.

गिरणा धरण योजना, घरकुल, सामान्य रूग्णालय आदी विविध विकासकामे शेख रशीद यांच्या काळातच साकारली गेली. जनतेच्या समस्यामुक्तीचा मार्ग म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. यामुळेच रशीद जननायक बनले असल्याचे सांगत आ. पाटील यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत आसिफ शेख हे पक्षाचे उमेदवार राहणार असून शहराला विकासाच्या शिखरावर नेण्यासाठी त्यांच्या पाठीशी तुम्ही उभे राहावे, असे आवाहन केले.

यावेळी अध्यक्षीय भाषणात डॉ. सईद फैजी यांनी केंद्र व राज्य सरकारतर्फे स्मार्ट सिटी योजना स्मार्ट सिटीमध्येच राबविण्यात येवून त्यांना ओव्हर स्मार्ट केले जात आहे. मालेगावला स्मार्ट सिटी योजनेत आणण्यासह वैद्यकिय महाविद्यालय सुरू होण्याच्या दृष्टीकोनातून लक्ष घालण्याचे आवाहन केले.

यावेळी सत्कारास उत्तर देतांना शेख रशीद यांनी जनतेने दिलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शहराच्या विकासासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने कधीच निधीची कमतरता भासू न दिल्याने ही विकासकामे साकारता आली. गिरणेच्या योजनेमुळेच शहरातील स्थलांतर होवू शकले नाही. दंगलखोरांना नाकारत जनतेने आपल्या प्रयत्नांना साथ दिल्यानेच आज शहरात शांतता नांदत असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी माजी महापौर ताहेरा शेख, माजी आ. आसिफ शेख, इरशाद अंजूम आदींची भाषणे झालीत. प्रास्ताविक शकील बेग यांनी केले. सत्कार सोहळ्यास 30 हजारावर जनसमुदाय उपस्थित होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com