एकलहरे प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मुख्यमंत्री दरबारात

एकलहरे प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मुख्यमंत्री दरबारात

देवळाली कॅम्प | वार्ताहर | deolali Camp

एकलहरे (Eklahare) येथील प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थींच्या विविध मागण्या व त्याचे निवारण करण्याचा प्रश्न थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) दरबारी सादर झाला आहे. याबाबत आपण सकारात्मक असून या शिवाय मतदारसंघातील इतर प्रश्न सोडविण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची माहिती आ. सरोज आहिरे (MLA Saroj Ahire) यांनी दिली...

आ.आहिरे यांनी एकलहरे येथे प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थींची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या.

त्यावेळी येथील मुख्य अभियंता एस. एस. शिंदे (S. S. Shinde) यांच्यासोबत बैठक घेऊन कार्यरत असलेल्या प्रकल्पग्रस्त कुशल प्रशिक्षणार्थींना कौटुंबिक आरोग्य विमा लागू करावी, सरळ सेवा भरतीत प्रशिक्षणार्थींसाठी महानिर्मितीत पन्नास टक्के जागा आरक्षित ठेवाव्यात, ज्याप्रमाणे तीन वर्षे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारास सेवेत कायम केले जाते त्याच धर्तीवर प्रकल्पग्रस्तांना महानिर्मिती कंपनीत कायम करावे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपण याबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले. तसेच आ.आहिरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut), ऊर्जाराज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakta Tanpure) व पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनादेखील निवेदन देऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com