
वार्ताहर | सप्तशृंगीगड
अर्धेशक्तीपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सप्तशृंगी गडावर (Saptshringi Fort) भाविक व ग्रामस्थांची (Devotees and villagers) मागणी पूर्ण करावी, अन्यथा उपोषण (Hunger Strike) करण्यात येईल असा इशारा सप्तशृंगी गडावरील ग्रा.पं. सदस्य संदीप बेनके (Sandeep Benke) यांनी दिला आहे...
सप्तशृंगी गडावर हजारो भाविक नतमस्तक होतात. मात्र, सप्तशृंगी क्षेत्रात सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या (Saptshringi Devi Trust) वतीने पुरेशी भौतिक सेवा पुरविणे गरजेचे आहे. याकरिता देवी संस्थांच्या वतीने अंमलबजावणी करावी यासाठी निवेदन देऊन बेनके यांनी ही मागणी केली आहे.
दरम्यान, येत्या १५ दिवसात देवी संस्थांच्या वतीने दखल न घेतल्यास उपोषणाचा इशारा ग्रा.पं. सदस्य संदीप बेनके,धनंजय गायकवाड यांनी सप्तशृंगी देवी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
भाविकांसाठी मागण्या पुढीलप्रमाणे
१) पहिली पायरी ते मंदिर मार्गावर भाविकांसाठी सुलभ शौचालय बांधणे
२) पहिली पायरी ते मंदिर मार्गावर भोजनालय व धर्मशाळा, महिलांसाठी हिरकणी कक्ष उभारणे
३) शिवालय तलाव सुशोभिकरण करणे
४) साधू महंत यांना गाभारा दर्शन देणे
५) चैत्रउत्सव व नवरात्रोत्सव यात्रा कालावधी व इतर वेळेस पायी येणाऱ्या गरजू भाविकांसाठी निवारा शेड उभारणे
६) आई भगवतीचा गाभारा पूर्वीप्रमाणे करण्यात यावा
७) पायरीवर नारळ फोडणे, कापूर लावणे यासारख्या जुन्या परंपरा प्रथा सुरू कराव्यात
८) रामटप्पा ते मंदिर परिसरात कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची नेमणूक करणे
९ ) पहिली पायरी ते उतरती पायरी तसेच मंदिर परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे
१०) सप्तशृंगी देवी ट्रस्टमार्फत गावाच्या वेशीवर भव्यदिव्य प्रवेशद्वार उभारण्यात यावे.
स्थानिक ग्रामस्थांच्या समस्या
१) स्थानिक आदिवासी व इतर कर्मचारी यांना सातव्या वेतनात समाविष्ट करावे
२) स्थानिक कर्मचारी यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर ट्रस्टच्या सेवेत घ्यावे
३) सर्व कर्मचारी यांचा वैद्यकीय विमा किंवा वैद्यकीय प्रतिपूर्ती ( शासन धर्तीवर ) लाभ देण्यात यावा
४) स्थानिक ग्रामस्थ यांना महापूजा आरती देणगीमध्ये तसेच सर्व कार्यक्रमासाठी हॉल भाड्यात ७५ टक्के सवलत द्यावी
५ ) ट्रस्ट घटनेत बदल करून विश्वस्तसमितीची संख्या ११ करण्यात यावी तसेच स्थानिक ग्रामस्थांना विश्वस्त पदावर घ्यावे
६) स्थानिक बेरोजगार युवकांना नोकरभरती प्रक्रियेत प्रथम प्राधान्याने सवलती देण्यात यावी
७) स्थानिक गरजू ग्रामस्थ व कर्मचाऱ्यांना वैद्यकीय कारणास्तव तात्काळ २०० रुपयांची करण्यात यावी
८) भाविकांचा सुरक्षेच्या दृष्टीने गावात सी.सी.टीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे
९) मूर्ती संवर्धन प्रक्रियेबाबतची माहिती ग्रामस्थांना देण्यात यावी
१०) नव्याने मंदिराचे जीर्णोद्धारचे काम ग्रामस्थ, पुरोहित वर्ग, आणि भाविकांना विश्वासात घेऊन करण्यात यावे