कृषी विभागाचा अधिकारी असल्याचे भासवून पैशांची मागणी

कृषी विभागाचा अधिकारी असल्याचे भासवून पैशांची  मागणी

येवला | प्रतिनिधी | Yeola

तालुक्यातील नगरसूल (Nagrsul) येथे कृषी विभागाचा अधिकारी (Agriculture Department Officer) असल्याचे भासवून कृषी निविष्ठा विक्री केंद्र चालकांना त्रास देऊन पैसे मागणाऱ्या इसमाविरोधात येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदाराचे नगरसूल येथे कृषी सेवा केंद्र (Agricultural Service Centre) असून ते शेतीची औषधे, बियाणे, खते, यांची विक्री करतात. या तक्रारदाराला एका फोन नंबरवरून अनोळखी इसमाचा फोन आला. फोन करणाऱ्या इसमाने कृषी अधिकारी बोलत असल्याचे सांगून त्याने तुमच्या सेवा केंद्रामध्ये खते ठेवता का, त्यासाठीचा परवाना आहे का, तुमच्या स्टकच्या नोंदी आहेत का अशी विचारणा केली.

याशिवाय त्या इसमाने पुढे तक्रारदाराला तुमच्या कृषीसेवा केंद्राची तपासणी केली तर तुम्ही गोत्यात याल. तुमचा परवाना रद्द होईल, माल जप्त होईल, असा दम दिला. असे न केल्यास तीन हजार रुपये पाठवा म्हणत पैशांची मागणी केली.

दरम्यान, यानंतर नगरसूल आणि येवला येथील कृषी निविष्ठा विक्रेते यांनी एकत्रित येत सदर इसमाविरुद्ध येवला पोलीस ठाण्यात (Yeola Police Station) गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी त्या इसमास अटक केली आहे..

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com